ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बोलावलं नसल्यानं राखी सावंत झाली मुकेश अंबानींवर नाराज - राखी सावंत

Rakhi Sawant : राखी सावंतनं मुकेश अंबानींवर जोरदार हल्ला चढवला आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीला बोलावलं नसल्यानं राखीनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Rakhi Sawant
राखी सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 7:04 PM IST

मुंबई - Rakhi Sawant : बी-टाऊनची मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल क्वीन राखी सावंत नेहमी तिच्या करामतीमुळे चर्चेत असते. लग्न आणि घटस्फोटामुळे काही काळ चर्चेत असलेल्या राखी सावंतनं आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी चक्क राखी सावंतनं मुकेश अंबानींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंतनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आमंत्रित न केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. राखी सावंतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया मांडताना दिसत आहे.

राखी सावंत मुकेश अंबानींवर संतापली : या व्हायरल व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हटलं की, ' नमस्कार अंबानीजी तुम्ही इतके पैसे खर्च करू रिहानासारख्या स्टार्सना पार्टीला बोलावलं होतं, किमान तुम्ही मलाही बोलावले असते, मी डान्स करून स्टेज तोडले असते, खुर्च्या आणि इतर वस्तूही मोडल्या असत्या. माझा डान्स तुम्ही अजून पाहिला नाही. मी 'मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए', 'टुक टुक देखे', 'परदेसिया', अशी अनेक गाणी केली आहेत. अंबानीजी, तुम्ही मला या कार्यक्रमात बोलावलं असतं तर तुमचा फायदा झाला असता. ती रिहाना फाटलेले कपडे घालून आली आणि मी चांगले कपडे घालून आली असती. मी चांगला डान्स केला असता. संपूर्ण फ्लोर साफ केला असता. याशिवाय मी भांडी देखील धुतली असती.''

अनंतला माझ्या स्वाधीन करा : यानंतर राखी सावंतनं म्हटलं, ''तुम्ही अंबानीजी अनंत अंबानीला 5 दिवसांसाठी माझ्याकडे सोपवा, अनंतचं वजन किती वाढलं आहे. मी त्याचं वजन कमी करून देईन. राधिका ही किती सुंदर दिसत होती. मी तुमच्या मुलाला बारीक करेल. तुम्ही आनंदी होणार आणि तुमची सून आनंदी राहील. तुम्ही आणि तुमचा मुलगा मला कधीच विसरू शकणार नाही.'' राखीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. एकानं या पोस्टवर लिहिलं, ''तुला प्री वेडिंगला बोलवण त्यांना परवडलं नसतं.'' दुसऱ्या एकानं लिहिलं , ''तुझी अंबानीच्या घरी जाण्याची लायकी नाही.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर 'आशिकी 3'वर दिलं टी- सीरीजनं स्पष्टीकरण
  2. अजय देवगण स्टारर 'शैतान'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केलं उत्तम कलेक्शन
  3. ऑस्कर 2024 अवॉर्ड्स कधी आणि कुठे पाहू शकता, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.