ETV Bharat / entertainment

अनंत अंबानीनं लग्नासाठी अक्षय कुमारला केलं आमंत्रित, व्हिडिओ व्हायरल - ANANT AMBANI AND RADHIKA MERCHANT

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 5:18 PM IST

Anant ambani and Radhika merchant : अनंत अंबानी अक्षय कुमारला लग्नासाठी आमंत्रित केलं. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात तो कारमध्ये बसून असल्याचं दिसत आहे.

Anant ambani and Radhika merchant
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ((फाइल फोटो) (IANS))

मुंबई - Anant ambani and Radhika merchant : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या नात्याची चर्चा संपूर्ण देशातच नाही तर परदेशातही आहे. हे जोडपे 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्न करणार आहे. सध्या अंबानी कुटुंबातील सदस्य आपल्या खास पाहुण्यांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यात व्यग्र आहेत. अलीकडेच मुकेश अंबानी राधिका मर्चंटबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लग्नपत्रिका देण्यासाठी गेले होते. नीता अंबानीनं आपल्या मुलाच्या लग्नासाठी बाबा विश्वनाथ यांना पहिलं आमंत्रण दिलं आहे.

अनंत अंबानी अक्षय कुमारच्या घरी पोहोचला : तसेच अनंत अंबानी देखील पाहुण्यांना आमंत्रित करण्यात व्यग्र आहेत. अलीकडेच अनंत हा बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणला त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता. आता तो आणखी एका बॉलिवूड सुपरस्टारच्या घरी पोहोचला आहे. तो स्वत: सुपरस्टार अक्षय कुमारच्या घरी त्याला लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी गेला आहे. बुधवारी रात्री अनंत त्याच्या रोल्स रॉयसमध्ये अक्षय कुमारच्या जुहू येथील निवासस्थानी स्पॉट झाला. अनंत त्याच्या बॉडीगार्डसह होता. आता त्याचा एक व्हिडिओ पापाराझीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका : व्हायरल व्हिडिओत तो गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्त्यामध्ये दिसत आहे. अक्षयच नाही तर अनंत अंबानी स्वतः अजय देवगण आणि काजोलला त्यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिकाही चर्चेत आहे. अलीकडेच, या जोडप्याच्या लग्नाच्या कार्डचा व्हिडिओ समोर आला होता. हे कार्ड खूप आकर्षक होतं. अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका कपाटाच्या आकारात बनवली गेली आहे. ही पत्रिका उघडल्यावर प्रथम देव दिसतो. या कार्डवर एक चांदीचे मंदिर दिसते, त्याभोवती देवांच्या मूर्ती आहेत. देवांव्यतिरिक्त, लग्नाच्या उत्सवाचे तपशील कार्डमध्ये लिहिलेला आहे.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरूवात, पाहा कमाई - kalki 2898 ad box office day 1
  2. शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार 'बंजारा' चित्रपट - movie Banjara
  3. अक्षय कुमार आणि राधिका मदन स्टारर आगामी चित्रपट 'सरफिरा'मधील दुसरं गाणं रिलीज - AKSHAY KUMAR AND RADHIKA MADAN

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.