मुंबई - अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातमी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना रोजचं वेगवेगळ वळण मिळत आहे. सध्या या बातम्यांवर स्टार कपलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आपल्या एका पोस्टनं लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांदरम्यान अमिताभ बच्चन यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांची पोस्ट : अमिताभ बच्चन यांनी काल रात्री केबीसी 16च्या सेटवरील स्वतःचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कर भाऊ, कितीही प्रयत्न केले तरी आता चेहऱ्याला काही होणार नाही!' या पोस्टवर अमिताभ बच्चन चाहते आपल्या भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अमिताभ यांचा फोटो अनेकांना पसंत पडत आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाईक बटण दाबले आहेत. एका चाहत्यानं यावर लिहिलं आहे की, 'तुम्ही लोकांना असेच प्रेरणा देत राहा.' दुसरा चाहता लिहिलं, 'तुम्ही सर्वोत्तम आहात'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'सर तुम्ही सुपरस्टार आहात.'
अभिषेक आणि ऐश्वर्याचं प्रकरण : अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट अशावेळी आली आहे, जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटच्या बातम्या सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या विभक्त होण्याच्या अफवा दिवसेंदिवस वाढत आहेत. आता अभिषेक आणि ऐश्वर्यामधील या प्रकरणात अभिनेत्री निम्रत कौरचं नाव देखील समोर आलं आहे, यामुळे या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या अफवा या आणखी जोर धरत आहेत. दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात घरगुती वाद असल्याचं सांगितलं जात आहे. अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चनमुळे घरात वाद वाढत असल्याचं कारण यापूर्वी समोर आलं होतं.
हेही वाचा :