ETV Bharat / entertainment

हॅपी बर्थडे बिग बी: वर्षातून दोनदा वाढदिवस का साजरा करतात अमिताभ बच्चन? - BIG B BIRTHDAY

Big B Birthday : अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. पण ते वर्षातून दोनदा वाढदिवस का साजरा करतात हे जाणून घ्या.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन ((Instagram (amitabhbachchan)))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 10:06 AM IST

Updated : Oct 11, 2024, 1:49 PM IST

मुंबई - 'सदी के महानायक', 'शहेनशाह', 'अँग्री यंग मॅन', 'मेगास्टार ऑफ द सेंचुरी' आणि 'बिग बी' अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हिंदी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही अमिताभ तंदुरुस्त, उत्साही आहेत आणि अजूनही चित्रपटांमध्ये तरणांनाही लाजवेल इतके सक्रिय आहेत. पाच दशकांच्या आपल्या कारकिर्दीत अमिताभ यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एवढ्या प्रदीर्घ करिअरमध्ये त्यांच्या आयुष्यात अनेक अद्भूत गोष्टी आहेत. त्यापैकीच एक आहे त्यांच्या वाढदिवसाच्या सेलेब्रिशनची. बिग बी एकदा नाही तर दोनदा आपला वाढदिवस साजरा करतात, याविषयी फार कमी चाहत्यांना माहिती आहे.

बिग बी वर्षातून दोनदा साजरा करतात वाढदिवस!

अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे 11 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. हा दिवस त्यांच्या मूळ वाढदिवसाचा असल्यामुळे याचं मोठ्या प्रमाणावर सेलेब्रिशन होतं, परंतु बिग बी वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात. 2 ऑगस्ट रोजी ते आपला दुसरा वाढदिवसही साजरा करतात. 1982 मध्ये अमिताभ बच्चन 'कुली' या चित्रपटाचे शूटिंग करत असताना गंभीर जखमी झाले होते. बंगळुरूमध्ये एका फाईट सीनच्या दरम्यान त्यांना त्यांना चित्रपटाचा खलनायक पुनीत इस्सारचा चुकून पोटामध्ये ठोसा लागला. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण या गंभीर अपघातामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता.

अमिताभ यांचा पुनर्जन्म

यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुंबईच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की डॉक्टरांनी निराश होऊन हात वर केले होते. पण 2 ऑगस्ट रोजी बेशुद्ध अमिताभ यांनी आपला अंगठा हलवला आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना महत्प्रयासानंतर मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढलं. अशा प्रकारे त्यांचा हा दुसरा जन्म झाला. याकाळात देशभरातीलतमाम चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. यातून ते सहीसलामत बाहेर आले, म्हणूनच बिग बी 2 ऑगस्टला त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा करतात. अमिताभ जेव्हा मुंबईच्या रुगणालयातून सुखरुप बाहेर आले तेव्हा हजारोंचा जनसमुदाय त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आला होता. तेव्हा अमिताभ म्हणाले होते की, 'आता मी मृत्यूवर विजय मिळवून घरी परतत आहे.'

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द

सात नायक असलेल्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून बिग बींनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर अमिताभ यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि जवळपास 5 दशकांपासून अधिक काळ ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. अमिताभ यांचा अलीकडेच 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका संस्मरणीय ठरली. या वयातही ज्या ऊर्जेनं त्यांनी भूमिका साकारली आहे त्याचं जगभर कौतुक होतंय. या चित्रपटात साउथ स्टार प्रभास याच्यासह दीपिका पदुकोण, कमल हसन यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान, राजामौली यांसारख्या स्टार्सनीही यात खास कॅमिओ केला आहे.

Last Updated : Oct 11, 2024, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.