मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक होता. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबातीत वादळ निर्माण करत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होताच या चित्रपटानं धुमाकूळ घातला असून पहिल्याच दिवशी, 'पुष्पा 2'नं 175 कोटीची कमाई केली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 'आरआरआर'चा विक्रम मोडला आणि देशांतर्गत रेकॉर्डब्रेक कलेक्शन केलं आहे. 'पुष्पा 2'नं खूप जलद गतीनं जगभरात 294 कोटी कमावले. यामध्ये सर्व भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. 'पुष्पा 2'ची वाढती मागणी पाहून, निर्मात्यांनी पेड प्रीव्यू शो देखील चालवले, ज्यामुळे या चित्रपटाचा आणखी फायदा झाला. 'पुष्पा 2'च्या पेड प्रीव्यूनं 10.65 कोटीची बॉक्स ऑफिसवर कमाई केली. या चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कलेक्शननं 250 कोटी रुपये आणि जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला. आता 'पुष्पा 2'नं तिसऱ्या दिवशी किती कमाई याबद्दल जाणून घेऊया...
तिसऱ्या दिवसाचे 'पुष्पा 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'पुष्पा 2' हा चित्रपट जगभरात रुपेरी पडद्यावर 5 डिसेंबर रोजी दाखल झाला. या चित्रपटानं 175 कोटी कमावत जबरदस्त ओपनिंग करून एक इतिहास रचला. याशिवाय रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी कमावले. आता तिसऱ्या दिवशी, या चित्रपटानं जबरदस्त कलेक्शन केलंय. या चित्रपटानं शनिवारी 115 कोटीची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचं तीन दिवसांचे कलेक्शन 383.7 कोटी झालं आहे. या कलेक्शनमध्ये पेड प्रीव्यू समाविष्ट आहे. 'पुष्पा 2'नं तिसऱ्या दिवशी हिंदीमध्ये 73.5 कोटी, तेलुगूमध्ये 31.5 कोटी, तमिळमध्ये 7.5 कोटी, कन्नडमध्ये 0.8 कोटी आणि मल्याळममध्ये ₹1.7 कोटी कमावले आहेत.
'पुष्पा 2'चं देशांतर्गत कलेक्शन
पेड प्रीव्यू - 10.65 कोटी
पहिला दिवस- 164.25 कोटी
दुसरा दिवस - 93.8 कोटी
तिसरा दिवस - 115 कोटी
तीन दिवसांचे एकूण कलेक्शन 383.7 कोटी
'पुष्पा 2' जागतिक कलेक्शन : 'पुष्पा 2'नं केवळ भारतातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. 'पुष्पा 2'नं 500 कोटी कमावणाऱ्या सर्वात जलद चित्रपटांमध्ये स्थान मिळाले आहे. आता रविवारचे आकडेवारी येणं बाकी आहे.
पुष्पा 2 - 500 कोटी (3 दिवस)
बाहुबली 2- 500 कोटी (3 दिवस)
केजीएफ 2- 500 कोटी (4 दिवस)
आरआरआर - 500 कोटी (4 दिवस)
पठाण - 500 कोटी (5 दिवस)
'पुष्पा 2' नवे रेकॉर्ड बनवेल : 'पुष्पा 2'नं आरआरआर'ला मागे टाकलं आहे. याशिवाय हिंदीतील सर्वात मोठी ओपनिंग, 'जवान'ला देखील या चित्रपट मागे टाकत आहे. 'पुष्पा 2' जगभरातील सर्वात मोठी ओपनिंग असलेला भारतीय चित्रपट बनला आहे. आता निर्मात्यांची नजर वीकेंडच्या कलेक्शनवर आहे. हा चित्रपट जगभरात 700 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा सध्या 'पुष्पा 2'च्या निर्माते करत आहेत. जर बॉक्स ऑफिसवर असेच कलेक्शन सुरू राहिल्यास हा चित्रपट लवकरच 1000 कोटींचा टप्पा पार करेल.
हेही वाचा :