मुंबई - 'पुष्पा : द रुल' चित्रपटाच्या रिलीजची तारीख जवळ येत असताना अल्लु अर्जुननं प्रमोशनचा धमाका लावला आहे. पाटणा येथे भव्य समारंभात ट्रेलर लॉन्च केल्यानंतर 'पुष्पा आणि श्रीवल्ली'चा जलवा केरळच्या कोचीमध्ये पाहायला मिळाला. उत्तर आणि दक्षिणेत जोरदार हवा निर्माण केल्यानंतर 'पुष्पा'ची टीम काल मुंबईत दाखल झाली होती. जबरदस्त डायलॉग आणि गाण्याच्या ठेक्यावर मुबईकरांना खूश करण्यात अल्लु अर्जुन यशस्वी झाला आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात अल्लू अर्जुन काळ्या वेशात चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. रश्मिकाही त्याच्यासोबत काळ्या रंगाच्या साडीत मॅचिंगमध्ये दिसत आहे.
दरम्यान, मुंबईत जमलेल्या हजारो चाहत्यांसमोर जेव्हा अल्लु अर्जुन अवतरला तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरानं माहोल तयार झाला. जेव्हा त्याला मुंबईकरांनी डायलॉगची फर्माईश केली तेव्हा त्यानं "पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझा क्या... फायर हूँ मै, वाईल्ड फायर", असे म्हणताच लोकांनी जल्लोष केला. याआधी अल्लू अर्जुननेही मुंबईत पोहोचताच रश्मिका मंदान्नाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये अल्लू अर्जुनने लिहिले होते की, 'पुष्पा आणि श्रीवल्ली तुमच्या हृदयात त्यांची जागा बनवत आहेत'. कार्यक्रमात अल्लू अर्जुनने रश्मिकाला स्टेजवर डान्स करण्यासाठी आमंत्रित केले, त्यानंतर दोघांनीही 'अंगारों का...' गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
The moment of the evening 😍
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) November 29, 2024
Pushpa Raj and Srivalli dance for the #Angaaron song at the #Pushpa2IconicPressMeet 🫶
Watch the event live here!
▶️ https://t.co/BaDjjcImCM#Pushpa2TheRule#Pushpa2TheRuleOnDec5th
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku #FahadhFaasil… pic.twitter.com/6TjoMrvBVn
'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी 29 नोव्हेंबर रोजी चित्रपटाच्या नवीन गाण्याचा पीलिंग्सचा प्रोमो रिलीज केला आहे. दिग्दर्शक सुकुमारच्या 'पुष्पा 1' मधील प्रसिद्ध 'सामी सामी' गाण्याच्या धर्तीवर, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर या नव्या गाण्याची बीट देखील भरपूर एनर्जटिक आहे. या गाण्यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची आगळीवेगळी केमिस्ट्री पाहायला मिळेल याचा अंदाज या प्रोमोवरून लावला जाऊ शकतो.
'पुष्पा 2' चा प्रमोशन दौरा : 'पुष्पा 2' च्या रिलीजपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभर इव्हेन्ट्सचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी 'पुष्पा : द रुल'ची संपूर्ण टीम पाटणा, बंगलोर, चेन्नई, कोलकाता, कोची, मुंबई आणि हैदराबादसह अनेक मोठ्या शहरांना भेट देत आहे. चित्रपटाची आगाऊ बुकिंग भारतात 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर अमेरिकेत आधीच विक्रीला वेग आला आहे. 'पुष्पा: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा -