मुंबई - अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट आज 5 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर 12,500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाबद्दल तयार झालेलं आकर्षण केवळ अभूतपूर्व आहे. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत एक गेम चेंजर बनण्यासाठी तयार आहे.
जगभरात 250 कोटींचा गल्ला पार करणारा 'पुष्पा 2' पहिला चित्रपट आहे. हा सिनेमा रिलीजच्या सुरुवातीच्या दिवशी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे. इंडस्ट्रीतील जाणकारांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हा चित्रपट जगभरात 270 कोटी रुपयांची कमाई करु शकेल. हा पराक्रम गाजवणारा अल्लू अर्जुन इतिहासातील पहिला अभिनेता बनला आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्माण झालेल्या अपेक्षेमुळे हा चित्रपट संपूर्ण भारतातील अनेक राज्यामध्ये वर्चस्व गाजवेल असा अंदाज आहे.
जाणकारांनी व्यक्त केलेला 270 कोटीचा अंदाज खरा ठरला, तर पुष्पा 2 'आरआरआर'चा ओपनिंग डे रेकॉर्ड मोडेल. जगभरातील 257 रुपयांच्या कमाईसह, आरआरआरने आतापर्यंत भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डेचा विक्रम केला आहे.
पुष्पा 2 च्या अपेक्षित ओपनिंग डे कलेक्शनचा तपशील
- आंध्र प्रदेश/तेलंगणा: रु. ९० कोटी
- कर्नाटक: 15 कोटी
- तामिळनाडू: 8 कोटी
- केरळ : ७ कोटी
- उर्वरित भारत: 80 कोटी
- एकूण भारत: 200 कोटी रुपये
- परदेशी बाजार: 70 कोटी
- जगभरातील एकूण प्रक्षेपण: 270 कोटी
( वरील आकडे सॅकनिल्क बॉक्स ऑफिस डेटाच्या मदतीनं आहेत. )
पहिल्या दिवशी कमाईचे वरील आकड्यावरुन दिसतंय की 'पुष्पा 2' हा चित्रपट अनेक विक्रम रचू शकतो. विशेषत: प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिस कामगिरीच्या बाबतीत भारतीय सिनेमासाठी एक नवीन ध्येय निर्माण करेल.
'पुष्पा 2' हा चित्रपट पारंपारिक शुक्रवारच्या रिलीजच्या ऐवजी गुरुवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्याच्या शर्यतीत त्याला एक धार मिळाली. हा अपारंपरिक रिलीज दिवस निवडून, निर्मात्यांनी खात्री करुन घेतली की याला पहिल्या दिवशी कसा उत्तम प्रतिसाद मिळू शकेल. 5 डिसेंबर रोजी चित्रपटाचे अधिकृत रिलीज असले तरी 4 डिसेंबरच्या रात्री अत्यंत अपेक्षित प्रीमियर शोसह झाले. यामुळे चित्रपटाच्या डायहार्ड फॅन्सच्या प्रतिसादनं एका भव्य उद्घाटनासाठी मंच तयार केला. संध्याकाळपर्यंत कमाईचे आकडे स्पष्ट होतील.
मोठ्या रिलीजसह, 'पुष्पा 2' कमाईच्या बाबतीत किती पुढे जाणार हे पाहणे मनोरंजक असेल. दमदार परफॉर्मन्स, आकर्षक कथा आणि मोठ्या प्रमाणावर पोहोचल्यामुळे अल्लू अर्जुन आणि त्याची टीम बॉक्स ऑफिसवर राज्य करण्याची शक्यता आहे.