ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन आणि ॲटलीच्या आगामी प्रोजेक्टमध्ये त्रिशा कृष्णनची झाली एंट्री - allu arjun - ALLU ARJUN

Allu Arjun : दिग्दर्शक ॲटली अल्लू अर्जुनबरोबर एक चित्रपट करणार आहे. या चित्रपटात त्रिशा कृष्णन देखील दिसणार आहे. याबद्दल आता सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहेत.

Allu Arjun
अल्लू अर्जुन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 6:09 PM IST

Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Allu Arjun : अभिनेता शाहरुख खानबरोबर 'जवान' या चित्रपटातून धमाल करणारा साऊथचा दिग्दर्शक ॲटली आता त्याच्या नवीन प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. तो साऊथचा सुपरस्टार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुनबरोबर काम करणार असल्याच्या चर्चा आहेत. ॲटली पहिल्यांदाच अल्लू अर्जुनबरोबर एकत्र काम करणार आहे. ॲटली आणि अल्लूच्या या दमदार कॉम्बिनेशनच्या चित्रपटात साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णननं एन्ट्री केली आहे. याशिवाय या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंद्र संगीत देणार आहे. अल्लू अर्जुन आणि तृषा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाकडून अल्लूच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

ॲटली आणि अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी येणार एकत्र : या पोस्टमध्ये ॲटली आणि अल्लू दिसत आहे. अनेकजण या व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट्स करून या चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान ‘अला वैकुंठपुररामुलू’ या चित्रपटाचे दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास हे अल्लू अर्जुनबरोबर एक चित्रपट बनवणार आहे. हा एक पीरियड चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटातही तृषा दिसणार असल्याच्या चर्चा या सोशल मीडियावर सुरू होत्या. अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल : 2021 मध्ये अल्लू अर्जुन 'पुष्पा' या चित्रपटात दिसला होता आणि तेव्हापासून अल्लू कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. आता तो 'पुष्पा 2' मध्ये दिसणार असून त्याच्या या चित्रपटाची अनेकजण वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार करत आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे. दरम्यान 'पुष्पा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप हिट झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीचं धुमाकूळ घातली होती. 'पुष्पा' चित्रपटातील गाणी देखील जगभरात हिट झाली होती. अनेकांना या चित्रपटाच्या गाण्यावर रील्स बनवले होते.

हेही वाचा :

  1. करीना, क्रिती, तब्बूच्या 'क्रू'ची उंच भरारी, तीन दिवसांत 30 कोटींची कमाई - Crew Box Office Day 3
  2. टायगर श्रॉफनं अक्षय कुमारला केलं 'एप्रिल फूल', प्रॅंक व्हिडिओ व्हायरल - APRIL FOOL
  3. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie

Last Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.