ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुननं नाकारला ॲटलीचा चित्रपट, सलमान खानची झाली एंट्री - allu arjun - ALLU ARJUN

Salman khan Allu Arjun and Atlee : 'जवान' दिग्दर्शक ॲटलीचा आगामी चित्रपट अल्लू अर्जुननं नाकारला आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याऐवजी आता सलमान खान दिसणार आहे.

Salman khan Allu Arjun and Atlee
सलमान खान, अल्लू अर्जुन आणि ॲटली (ॲटली (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 2:51 PM IST

मुंबई - Salman khan Allu Arjun and Atlee : 'जवान' या चित्रपटात शाहरुख खानबरोबर धमाल केल्यानंतर ॲटली आता बॉलिवूडचा आणखी एका सुपरस्टारबरोबर काम करणार आहे. माहितीनुसार अल्लू अर्जुननं ॲटलीचा चित्रपट नाकारला आहे. यानंतर ॲटलीनं या चित्रपटामध्ये सलमान खानला साईन केल्याचं समजत आहे. अल्लू अर्जुननं ॲटलीला या चित्रपटासाठी मोठी फी मागितली होती. ही फी 150 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडं, सलमानला या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तर त्यानं ही ऑफर स्वीकारली. यानंतर हा चित्रपट अल्लू अर्जुननं सोडला असल्याचं म्हटलं जात आहे.

ॲटली करणार सलमान खानबरोबर काम : आता ॲटली पुढच्या वर्षी सलमान खानबरोबर आपल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या बातमीवर आत्तापर्यंत ॲटली, सलमान खान आणि अल्लू अर्जुनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या चित्रपटाचे निर्माते सन पिक्चर्सनं देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर सलमान खान उद्या म्हणजेच 18 जूनपासून त्याच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान खान स्टारर 'सिकंदर' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा चाहत्यांना सलमान ॲक्शनमोडमध्ये दिसेल.

सलमान खान आणि ॲटलीचे आगामी चित्रपट : दरम्यान सलमान खान आणि ॲटलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'टायगर वर्सेस पठान' या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल सध्या काहीही अपडेट आलेली नाही. याशिवाय तो 'दबंग 4'मध्ये झळकणार आहे. याआधी 'दबंग'च्या तिन्ही पार्टनं रुपेरी पडद्यावर चांगली कमाई केली होती. आता सलमानला 'दबंग 4'कडून आशा आहे. दुसरीकडे ॲटलीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'बेबी जॉन' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात वरुण धवन हा मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच त्यांचा शाहरुख खानबरोबर 'लॉयन' आणि 'जवान 2' चित्रपट येणार आहे. सध्या हे दोन्ही चित्रपट खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. छोट्या मुलांसाठी आलिया भट्टनं 'पिक्चर बुक' केलं लॉन्च - Alia Bhatt
  2. लग्नाआधी सासरच्या मंडळींना भेटली सोनाक्षी सिन्हा, पाहा फोटो - Sonakshi Sinha wedding
  3. वरुण धवननं 'फादर्स डे'वर मुलीची पहिली झलक केली शेअर, पाहा फोटो - varun dhawanम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.