ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' शी होणारी लढत टाळण्यासाठी 'सिंघम अगेन' चित्रपटाची रिलीज तारीख बदलली - Allu Arjun Pushpa 2 - ALLU ARJUN PUSHPA 2

Allu Arjun Pushpa 2 : अजय देवगणची भूमिका असलेला 'सिंघम अगेन' हा स्वातंत्र्य दिना रोजी रिलीज न होता त्याऐवजी यंदाच्या दिवाळीला रिलीज होणार आहे. मोठ्या संख्येनं यामध्ये लाकार असल्यामुळे चित्रपट पूर्ण व्हायला अजून वेळ पाहिजे असल्याचं सांगण्यात येतंय. अजय देवगणने सोशल मीडियावर नवीन तारखेची घोषणा केली, यामध्ये दिवाळीला रिलीज निश्चित झाल्याचं म्हटलंय.

Ajay Devgn's Singham Again
'पुष्पा 2' आणि सिंघम अगेन (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 7:24 PM IST

मुंबई - Allu Arjun Pushpa 2 : चित्रपटसृष्टीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्यादिवशी चित्रपट रिलीज करण्यासाठी अनेक निर्माते विचारात आहेत. कारण यंदाचा 15 ऑगस्ट गुरुवारी येत असून लगेचच येणारा विकेंड डोळ्यासमोर कमाईसाठी चांगले दिवस ठरू शकतात. या दिवसात हमखास गर्दी होणार याची खात्री निर्मात्यांना आहे.

यावर्षी सर्वांच्या नजरा रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या सिंघम मालिकेचा तिसरा भाग सिंघम अगेन आणि अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या 'पुष्पा 2: द रुल'मधील बॉक्स ऑफिसवरील संघर्षाकडे होत्या. पण यामध्ये आता एक ट्विस्ट आला आहे. आता सिंघम अगेन नियोजित शेड्यूल प्रमाणे १५ ऑगस्टला पडद्यावर येणार नाही.

अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, आणि अर्जुन कपूर यांच्यासह स्टार-स्टडेड कलाकारांनी चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ मागितल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. अजय देवगणने सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'च्या नवीन रिलीजच्या तारखेचं लॉन्चिंग केलं. 'सिंगम अगेन' यंदाच्या दिवाळीला गर्जना करेल असं त्यानं लिहिलंय.

नुकत्याच झालेल्या एका मीडिया इव्हेंटमध्ये बोलताना अजय देवगणनं विलंबावर प्रकाश टाकला, "15 ऑगस्टपर्यंत चित्रपट तयार होईल याची आम्हाला खात्री नाही. त्यामुळे आम्हाला घाई करायची नाही. 'बहुत बार जल्दी जल्दी में काम खराब हो जाता है', त्यामुळे आम्ही आमचा अधिक वेळ देऊन चित्रपट पूर्ण करू."

आता हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित करण्याचे लक्ष्य आहे. नुकतेच, निखिल अडवाणी आणि जॉन अब्राहम यांनीही त्यांच्या 'वेदा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 12 जुलै वरून 15 ऑगस्टपर्यंत हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या जॉन स्टारर 'वेदा' चित्रपट 'पुष्पा 2'च्या समोरासमोर येत आहे. तथापि, चर्चा असे संकेत देत आहे की 'वेदा' चित्रपटाला सोलो रिलीजचे फायदे मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. 'ओ स्त्री रक्षा करना'!! 'मुंज्या'बरोबर 'स्त्री 2' चा टीझर रिलीज, थिएटरमध्ये झाला टाळ्यांचा कडकडाट - Stree 2 teaser
  2. अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ही जोडी 25 वर्षानंतर 'घरत गणपती' चित्रपटात पुन्हा एकत्र - Gharat Ganapati
  3. शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणताहेत 'थोडं तुझं आणि थोडं माझं'! - Thod Tujm Aag Thod Mazan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.