ETV Bharat / entertainment

अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती गेली... संगीत क्षेत्राला धक्का, गायिकेनं स्वतःच केला खुलासा - ALKA YAGNIK LOST HER HEARING

ALKA YAGNIK LOST HER HEARING : आपल्या आवाजाच्या जादूनं गेली अनेक दशकं मोहित करणाऱ्या अलका याज्ञिक यांना एका धोकादायक आजारानं गाठलं आहे. याबाबतचा एक खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे.

Alka Yagnik
अलका याज्ञिक (Alka Yagnik Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 1:49 PM IST

मुंबई - ALKA YAGNIK LOST HER HEARING : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी 80 आणि 90 चं दशक आपल्या जादुई आवाजानं गाजवलं होतं. आजही प्रत्येक वयोगटातील लोक त्यांची गाणी ऐकताना भारावून जातात. गायका अलका याज्ञिक यांनी काल रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर लोक हैराण झाल्याचं दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला जडलेल्या आजाराचा खुलासा केला आहे. या पोस्टनंतर त्याचे चाहते आणि सर्व सेलिब्रिटी त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अलका याज्ञिक ठरल्या दुर्मिळ विकाराच्या बळी

अलका याज्ञिक या दुर्मिळ आजाराच्या बळी ठरल्या आहेत. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली आहे. स्वतः अलका यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी एक जुना फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी माझ्या सर्व चाहत्यांना, मित्रांना आणि हितचिंतकांना सांगते की, काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाइटमधून बाहेर पडताच मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही.

आपल्याला झालेल्या आजाराबद्दलचा खुलासा करताना त्या पुढे लिहितात, "नंतरच्या काही आठवड्यांत थोडे धाडस केल्यावर, मी आता माझ्या सर्व मित्रांसाठी आणि हितचिंतकांसाठी माझे मौन सोडत आहे. व्हायरल अटॅकमुळे एक दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह श्रवणशक्ती कमी झाल्याचं माझ्या डॉक्टरांनी निदान केलं आहे...या अचानक, मोठ्या आघाताने मला पूर्णपणे नकळत गाठलं आहे. मी त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना कृपया तुम्ही माझ्यासाठीही प्रार्थना करा."

"माझ्या चाहत्यांसाठी आणि तरुण सहकाऱ्यांसाठी, सांगते की मोठ्या आवाजातील संगीत आणि हेडफोन्सच्या संपर्कात येण्याबाबत सावधगिरी बाळगा. एके दिवशी, मला माझ्या व्यावसायिक जीवनातील आरोग्य धोक्यात आल्याचं शेअर करायचं आहे. तुमच्या सर्व प्रेमानं आणि पाठिंब्यानं मी माझे जीवन पुन्हा सुरळीत करेन आणि लवकरच तुमच्याकडे परत येईन अशी आशा आहे. तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा या कठीण काळात माझ्यासाठी महत्त्वाचा असेल," अशी सविस्तर चिठ्ठी लिहून त्यांनी आपल्या दुर्मिळ आजाराबद्दल कळवलं आहे.

अलका याज्ञिक यांचे चाहते आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी गायकाच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा -

'पुष्पा 2' रिलीज पुढे ढकल्यानं चाहते नाराज, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या संयमाची सत्वपरीक्षा - Pushpa 2 The Rule Postponed

प्रत्येक क्षणाला मतीगुंग करणारा 'सरफिरा'चा ट्रेलर लॉन्च, प्रेक्षकांना चक्रावून सोडण्यासाठी अक्षय कुमार सज्ज - Sarafira trailer

'मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर होईल 'या' दिवशी रिलीज, पाहा तारीख - Mirzapur Season 3 Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.