ETV Bharat / entertainment

बॉलिवूड आणि साऊथकडील सेलिब्रिटींनी 2024 च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केल्या पोस्ट शेअर - World Environment Day 2024 - WORLD ENVIRONMENT DAY 2024

World Environment Day 2024 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, बॉलिवूडपासून तर साऊथकडील चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी पर्यावरणाबद्दल काही पोस्ट शेअर केल्या आहेत. आलिया भट्ट ते अल्लू अर्जुनसह या स्टार्स लोकांना पर्यावरणची निगा राखण्याचं आवाहन केलंय.

World Environment Day 2024
जागतिक पर्यावरण दिन 2024 (आलिया भट्ट और अल्लू अर्जुन (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 2:39 PM IST

मुंबई - World Environment Day 2024 : आज जागतिक पर्यावरण दिन 2024 जगभरात साजरा केला जात आहे. या दिवशी पृथ्वीवर अधिकाधिक झाडे लावण्यासाठी आणि जंगलतोड टाळण्यासाठी लोकांना हवामान बदलाबाबत जागरूक केले जाते. आजचा दिवस सर्वांसाठीचं खूप महत्वाचा आहे. जागतिक पर्यावरण दिन 2024 वर, बॉलिवूड ते साऊथमधील स्टार्सनी चाहत्यांना जागतिक पर्यावरण दिन 2024 ची जाणीव करून दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना या खास दिवशी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यामध्ये साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनपासून ते अजय देवगणपर्यंत लोकांना पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.

आलिया भट्ट : जागतिक पर्यावरण दिन 2024 वर आलिया भट्टनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या क्लिपद्वारे तिनं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अल्लू अर्जुन : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यानं 2024 च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर करून लिहिलं, "आपण सर्वांनी मिळून आपला देश चांगला बनवूया."

राम चरणाची पत्नी उपासनी कामिनेनी : 'आरआरआर' स्टार राम चरणची पत्नी उपासनी कामिनेनी सामाजिक विषयांवर सक्रिय असून मोकळेपणानं पोस्ट शेअर करून आपली प्रतिक्रया देत असते. जागतिक पर्यावरण दिन 2024 रोजी तिनं सोशल मीडियावर पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

अजय देवगण : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणनं जागतिक पर्यावरण दिन 2024 निमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक फिल्म स्टार आणि क्रिकेटर्स दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सर्वजण पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करत आहेत. हे स्टार्स आणि क्रिकेटर्स लोकांना जास्तीत जास्त हिरवळ राखण्याचं आवाहन करत आहेत. भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, कुशा कपिला, वरुण शर्मा, अजय देवगण, क्रिकेटर केएल राहुल, या सर्व स्टार्सनी पर्यावरणविषयी संदेश दिला आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अजयनं यावर लिहिलं, "तुम्ही बदला... मग जगातही बदल होईल."

मलायका अरोरा : अभिनेत्री मलायका अरोरानं आज जागतिक पर्यावरण दिन 2024 रोजी पृथ्वीचा फोटो शेअर करत एक संदेश दिला आहे. आपले पर्यावरण स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचं आवाहन तिनं केलंय.

शिल्पा शेट्टी : फिटनेस क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली शिल्पा शेट्टी ही निसर्गावर खूप प्रेम करते. तिची स्वतःची हिरवीगार बाग आहे. या बागेत ती योगा आणि ध्यान करते. जागतिक पर्यावरण दिन 2024 च्या विशेष प्रसंगी तिनं तिच्या चाहत्यांना पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

अनन्या पांडे : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडेनं स्वतःचा एक फोटो शेअर करून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. प्रतीक्षा संपली, प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर होणार 'या' दिवशी रिलीज... - Kalki 2898AD Trailer
  2. 'हीरामंडी : द डायमंड बाजार' फेम ताहा शाह बदुशा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चालवणार वारसा - Taha Shah Badussha
  3. अर्जुन रामपालनं रचला इतिहास, 'चाइल्ड रिलीफ अ‍ॅन्ड यू' अमेरिकेसाठी 1.5 डॉलर दशलक्ष केलं जमा - arjun rampal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.