ETV Bharat / entertainment

लंडनमधील होप गालामध्ये आलिया भट्टनं गायलं सुंदर गाणं, व्हिडिओ व्हायरल - Alia bhatt - ALIA BHATT

Alia bhatt : आलिया भट्टनं लंडनमध्ये होप गाला कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिनं गायका हर्षदीप कौरबरोबर गाणं गायलं. यानंतर तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alia bhatt
आलिया भट्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Alia bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट ही अभिनय आणि फॅशन सेन्ससाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याशिवाय ती अनेकदा गाणं गाताना देखील दिसते. आलिया लंडनमध्ये होप गाला कार्यक्रमासाठी उपस्थित होती. काल, 29 मार्च रोजी होप गाला 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आलियानं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमामधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. आता आलियाचा साडीचा लूक खूप चर्चेत आला आहे. परदेशात आलियाची देसी स्टाइल लोकांना खूप आवडली आहे. या कार्यक्रमातून आलियाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

आलिया भट्टनं गायलं गाणं : या व्हिडिओमध्ये ती प्रसिद्ध गायका हर्षदीप कौरबरोबर 'उडता पंजाब' या हिट चित्रपटातील 'एक कुडी' गाताना दिसत आहे. हर्षदीप कौरच्या विनंतीनंतर, आलिया सुंदर असं गाणं गायलं आहे. चाहते आलियाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना आणि तिच्या गाण्याचे कौतुक करताना दिसत आहे. याशिवाय काही चाहते असेही म्हणताना दिसत आहेत की, केवळ अभिनयच नाही तर आलिया गाण्यातही उत्तम आहे. आलियानं पुन्हा एकदा तिच्या आवाजाची जादू चाहत्यांमध्ये पसरवून त्यांना वेड लावले आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये आलिया लाल रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे.

आलिया भट्टचे वर्कफ्रंट : आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटी रणवीर सिंगबरोबर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटामधील आलियाचा अभिनय हा अनेकांना आवडला होता. आगामी काळात आलिया 'लव्ह अँड वॉर'मध्ये पती रणबीर कपूर आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहे. याशिवाय ती 'जिगरा' यशराज बॅनरचा स्पाय थ्रिलर आणि 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'जी ले जरा' ,'तख्त', इन्शाअल्लाह आणि 'मधुबाला' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. विजय देवेरकोंडा प्रेमविवाह करणार, पण...: व्हिडिओ व्हायरल - vijay deverakonda
  2. राजकुमार राव स्टारर श्रीकांत बोला बायोपिकचं नवं शीर्षक ठरलं, रिलीजची तारीखही जाहीर - Srikanth Bolla Biopic New Title
  3. चमकीला ट्रेलर लाँचमधील परफॉर्मन्स पाहून काही जण परिणीतीला म्हणाले, 'आज गाने की जिद्द ना करो' - Parineeti Chopra Singing

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.