ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा आफ्रिकेतील पारंपारिक डान्स व्हायरल - AKSHAY KUMAR T - AKSHAY KUMAR T

Akshay Kumar-Twinkle Khanna: अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर एक एनर्जेटिक व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय आणि ट्विंकल अफ्रीकामध्ये व्हेकेशनवर आहेत.

Akshay Kumar and Twinkle Khanna
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 6:56 PM IST

मुंबई - Akshay Kumar Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना आफ्रिकेत सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दोघेही स्थानिक आदीवासी जमातीबरोबर नाचताना दिसत आहेत. अलीकडे अक्षयनं मसाई मारा येथील हत्तीचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. या व्हिडिओला त्यानं एक मजेदार कॅप्शन दिलं होतं, "मी त्या दिवशी वाघ पोस्ट केला होता, आज हत्ती बघा आज टांझानियामध्ये आमच्या सफारीदरम्यान हा भव्य प्राणी पाहिला आणि मी त्याची मदत केली नाही पण शेअर केलं." अक्षय आणि ट्विंकलचं व्हेकेशन सुंदर जात असल्याचं दिसत आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा व्हिडिओ व्हायरल : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आफ्रिकेतील मसाई मारा येथील आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही आदीवासी जमातीचा पारंपारिक नृत्यामध्ये साथ देताना दिसत आहे. येथील हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, "आम्ही या दिवशी मनापासून नाचलो, ओमाहे या गृपबरोबर आम्ही डान्स केला, त्यांनी पिसे, कातडी आणि सिसालपासून बनल्या गेलेल्या साहित्य हे या रितुंगा नावाचे पारंपारिक नृत्यामध्ये वापरले होते. तुम्हाला काय वाटते की कोणी सुंदर डान्स केला. मला कमेंट्स करून याबद्दल सांगा. तुम्ही शेवटी कधी मुक्त होऊन डान्स केला आहे. तुम्ही डान्स केला का ? याबद्दल देखील सांगा."

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट : दरम्यान अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच प्रदर्शित झालेले 'सेल्फी', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा' या चित्रपटामध्ये तो दिसला होता. त्याचे हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. आता त्याचा आगमी चित्रपट 'खेल खेल में' बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामधील एक गाणं देखील निर्मात्यांनी रिलीज केलं आहे. हे गाणं अक्षयच्या चाहत्यांना खूप आवडलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'खेल खेल में' आणि 'स्त्री 2'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'स्कायफोर्स', 'वेलकम 3', 'जॉली एलएलबी 3', 'हाउसफुल 5', 'हेरा फेरी 3' आणि 'राउडी राठौर 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमार स्टारर 'खेल खेल में' चित्रपटातील 'हौली हौली' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - Khel Khel Mein first song
  2. अक्षय कुमारनं 10 पेक्षा जास्त चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर केलं दु:ख व्यक्त - akshay kumar Movie
  3. अक्षय कुमारनं कपिल शर्मा शोच्या शूटिंगदरम्यान बेहोश झालेल्या स्टंटमनचा जीव वाचवला, व्हिडिओ व्हायरल - Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.