ETV Bharat / entertainment

Akshay and Tiger Shroff : पाहा, 'बडे मियाँ' अक्षयची 'छोटे मियाँ' टायगरशी 'अशी ही बनवाबनवी' !! - akshay kumar took revenge

Akshay Kumar and Tiger Shroff Video : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. आता या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय टायगरची फसवणूक करताना दिसत आहे.

Akshay Kumar and Tiger Shroff Video
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 2:55 PM IST

मुंबई - Akshay Kumar and Tiger Shroff Video : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ॲक्शन अभिनेते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. सध्या दोघेही 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अक्षय आणि टायगरचा हा चित्रपट 10 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. दरम्यान, अक्षय आणि टायगरनं दिल्ली आणि लखनऊमध्ये देखील त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ या जोडीचा व्हायरल झाला आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार पहिल्यांदा उडी मारतो, तेव्हा त्याला टायगर श्रॉफ पकडतो. यानंतर जेव्हा टायगरची उडी मारण्याची वेळ येते, तेव्हा त्याला अक्षय सोडून देतो. याआधी स्विमिंग स्पर्धा केली झाली, ज्यामध्ये टायगरनं फसवणूक करून अक्षयला हरवले होते. अक्षय कुमारनं टायगरकडून मागील पराभवाचा बदला घेतला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अनेकदा आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात, त्यांचे व्हिडिओ अनेकांना आवडतात. आता अक्षयनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर चाहते अक्षयचं कौतुक करताना दिसत आहेत.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ वर्कफ्रंट : 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा आणि मानुषी छिल्लर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा, पूजा एंटरटेनमेंट आणि आझ फिल्म्सनं केली आहे. दरम्यान या जोडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अक्षय पुढं ' स्कायफोर्स', 'वेलकम टू जंगल', 'हाउसफुल्ल 5', 'हेराफेरी 3', 'राउडी राठोड 2', 'जॉली एलएलबी 3' आणि 'खेल खेल में' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय दुसरीकडे टायगर 'सिंघम 3' आणि रेम्बो या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. Fateh Teaser out : सोनू सूद स्टारर 'फतेह'चा थरारक टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ
  2. Madhubala biopic : मधुबालावरील बायोपिकची घोषणा, दिग्दर्शिका जसमीत के रीन करणार या चरित्रपटाचे दिग्दर्शन
  3. Tiger 3 World Tv Premiere : 'टायगर 3'चा होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर , पाहा 'या' दिवशी चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.