मुंबई Akshay Kumar On His Box Office Failure : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारनं 90 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 'मै खिलाडी तू अनाडी', 'खिलाडी', 'जानवर', 'अंदाज', 'हाऊसफूल' अशा ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम करत अक्षय कुमारनं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, सध्या मात्र अक्षयची गाडी ट्रॅकवरुन घसरल्याचं बघायला मिळतंय. मागील काही सिनेमे फ्लॉप गेल्यानं अक्षयची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडत आहे. सध्या अक्षय कुमार 'खेल-खेल में' या सिनेमामुळं चर्चेत आहे. या सिनेमातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'खेल-खेल में' सिनेमाच्या ट्रेलर रिलीज इव्हेंटदरम्यान अक्षयनं सिनेमांच्या अपयशाबद्दल भाष्य केलं.
मी सर्वकाही स्वबळावर कमावतो - अक्षय कुमार
यावेळी बोलत असताना अक्षय कुमार म्हणाला की, "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, मला या गोष्टींचं फार काही वाटत नाही. चार-पाच चित्रपट चालले नाहीत की लगेच मॅसेजेस येतात. पण मी म्हणतो काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे. मी अजून मेलो नाही. अनेकदा मला शोकसंदेश येतात. एकानं तर लिहिलं, काळजी करू नकोस तू परत येशील, मी त्याला फोन करून म्हटलं, भाऊ, तू असं का लिहितोय, परत येशील म्हणजे काय? मी कुठंच गेलो नाही, मी इथंच आहे. लोक काहीही म्हणाले तरी मी नेहमी काम करत राहीन. मला सकाळी उठून व्यायाम करायचाय, कामावर जायचंय. मी जे काही कमावतो, ते स्वबळावर कमावतो. मी कधीच कोणाकडं काही मागितलेलं नाही, मी शेवटच्या श्वासापर्यंत शूटिंग करत राहीन," असं त्यानं स्पष्ट सांगितलं.
'खेल-खेल में' बद्दल : 'खेल-खेल में' चित्रपटाचं दिग्दर्शन मुद्दसर अजीज यांनी केलंय. या चित्रपटाचा विलक्षण आणि विनोदी ट्रेलर आज रिलीज झालाय. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत फरदीन खान, एमी विर्क, आदित्य सील, वाणी कपूर, तापसी पन्नू आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट :
सरफिरा (2024)
बडे मियाँ छोटे मियाँ (2024)
मिशन राणीगंज (2023)
सेल्फी (2023)
राम सेतू (2022)
कठपुतली (2022)
रक्षा बंधन (2022)
सम्राट पृथ्वीराज (2022)
बच्चन पांडे (2022)
अतरंगी रे (2021)
सूर्यवंशी (2021) हिट
बेल बॉटम (2021) सरासरी
लक्ष्मी (2020) फ्लॉप
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट :
खेल खेल में
स्काई फोर्स
सिंघम अगेन
कनप्पा
जॉली एलएलबी 3
वेलकम टू द जंगल
शंकरा
हेही वाचा -