ETV Bharat / entertainment

"तू कधी 'दिशा' बदलू नकोस" टायगर श्रॉफला अक्षय कुमारचा अनमोल सल्ला - Akshay Kumar advice to Tiger Shroff - AKSHAY KUMAR ADVICE TO TIGER SHROFF

Akshay Kumar advice to Tiger Shroff : टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारने टायगरला एक मोलाचा सल्ला देताना "तू कधी 'दिशा' बदलू नकोस" असं म्हटलं. त्याचा रोख वेगळ्याच 'दिशा'कडे असल्यानं उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 9:50 AM IST

मुंबई - Akshay Kumar advice to Tiger Shroff : चित्रपटसृष्टीमध्ये एकत्र काम करताना अनेक कलाकारांचे सूत जुळते. हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटसृष्टींमध्ये अनेक अभिनेता-अभिनेत्री यांची जवळीक झालेली पाहायला मिळाली आहे. त्या जवळीकतेतून काहींनी विवाह देखील केले. परंतु अनेक फिल्मी जोडपी रिलेशनशिप्समध्ये होती किंवा आहेत. तरुणाईचा आणि खास करून तरुणींचा चाहता कलाकार म्हणजे टायगर श्रॉफ. त्याचे सिक्स पॅक्स आणि मार्शल आर्टस् त्याच्या चाहत्यांना जाम आवडतात. परंतु त्याचे व्यक्तिमत्व अत्यंत मितभाषी आणि लाजाळू. त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये त्याची कोणीच गर्लफ्रेंड नव्हती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मी २४-२५ वर्षांचा असेपर्यंत माझी कोणी गर्लफ्रेंड नव्हती. माझा पदार्पणीय चित्रपट 'हिरोपंती'चा निर्माता आणि आता माझा घनिष्ट मित्र साजिद नाडियादवालामुळे मला माझी पहिली गर्लफ्रेंड मिळाली', असे टायगर श्रॉफने नुकतेच पब्लिकली सांगितले. 'हिरोपंती'मध्ये त्याची हिरोईन होती क्रिती सेनॉन, पण ती काही त्याची गर्लफ्रेंड नव्हती. तर मग टायगरची गर्लफ्रेंड कोण होती किंवा आहे? टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी 'बेफिक्रा' नावाचा म्युझिक व्हिडीओ केला होता आणि त्यावेळी त्यांची मैत्री झाली. नंतर ते दोघे साजिद नाडियादवालाने निर्मिती केलेल्या 'बाघी २'मध्ये रोमँटिक जोडीत होते. एव्हाना त्याचे सूत जुळले होते आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही होत्या. परंतु लॉकडाऊनमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. आता ते पुन्हा एकत्र आल्याची चर्चा आहे.

Akshay Kumar advice to Tiger Shroff
टायगर श्रॉफला अक्षय कुमारचा अनममोल सल्ला

हे सगळं सांगण्याचं प्रयोजन म्हणजे टायगर श्रॉफचा नवा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' येऊ घातलाय. त्यात तो 'छोटे मियाँ'ची भूमिका करत असून अक्षय कुमार 'बडे मियाँ'च्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी दोघांना एकमेकांना काय सल्ला द्याल, असे विचारण्यात आले. टायगर म्हणाला की, "अक्षय सरांना मी काय सल्ला देणार? त्यांना पाहून मी ऍक्शन हिरो होण्याचे ठरविले. सर, तुम्ही असेच आम्हाला इन्स्पायर करीत राहा". नंतर अक्षय कुमार म्हणाला, "आता मला बोलायचे आहे का? काय बोलणार? एकच सल्ला देतोय तो म्हणजे, टायगर, तू कधी 'दिशा' बदलू नकोस." यावर अक्षय, जॅकी भगनानी, पृथ्वी, अलाया एफ, मानुषी छिल्लर, दीपशिखा देशमुख इत्यादी मंचावर उपस्थित लोक हसू लागले आणि प्रेक्षकांकडून हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडला.

हेही वाचा -

  1. नितेश तिवारीच्या 'रामायण'साठी रणबीर कपूर शिकला धनुर्विद्या, कोच बरोबरचे फोटो व्हायरल - Ranbir Kapoor learning Archery
  2. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम जेनिफर बंसीवालनं जिंकलाअसित कुमार मोदी विरुद्ध लैंगिक छळाचा खटला - TMKOC Fame Jennifer Baniswal

3. बॉबी देओल अभिनीत 'आश्रम 4' वेब सीरीज रिलीजची प्रतीक्षा सुरू - Bobby deol

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.