मुंबई - सिनेस्टार अजय देवगण आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अलीकडेच प्रदर्शित झाला. हा कॉप युनिव्हर्स चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात 275 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या यशानंतर अजय देवगण-रोहित शेट्टी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठीची तयारी करत आहेत. ही जोडी लवकरच 'गोलमाल 5' साठी काम सुरू करणार आहे.
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर 'गोलमाल 5' चे अपडेट्स शेअर केले आहेत. तरण आदर्श यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "अजय देवगण-रोहित शेट्टी 'गोलमाल फाइव्ह' सुरू करणार आहेत. गोलमाल फन अनलिमिटेड (2006), गोलमाल रिटर्न्स (2008), गोलमाल 3 (2010) आणि गोलमाल अगेन (2017) नंतर, कॉमेडी फ्रँचायझी (गोलमाल) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंघम अगेननंतर, अजय देवगण-रोहित शेट्टीची ब्लॉकबस्टर जोडी जगाला पुन्हा एकदा हसवायला तयार आहे. गोलमाल फाइव्हच्या अपडेटसाठी संपर्कात रहा."
2006 मध्ये 'गोलमाल: फन अनलिमिटेड' मधून सुरू झालेली ही कॉमेडीची फ्रँचाइज मालिका तिच्या अनोख्या व्यक्तिरेखा आणि कॉमिक संवादांमुळे चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांना आवडली होती. या यशानंतर 'गोलमाल'च्या सीक्वेलला चांगलं यश नेहमी मिळत आलं आहे.
या चित्रपटात अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे यांसारखी लोकप्रिय पात्रे आहेत. यातील प्रत्येकानं कलाकारांच्या केमिस्ट्रीमध्ये आणि फ्रेंचायझीच्या लोकप्रियतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. रोहित शेट्टीच्या कॉमेडी आणि अभिनयाच्या मिश्रणाने, गोलमाल आणि त्याची फ्रेंचायझी बॉक्स ऑफिसवर सातत्याने यशस्वी मिळवलं आहे. आजही 2006 मध्ये रिलीज झालेला 'गोलमाल: फन अनलिमिटेड' हा चित्रपट प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहात असतात. यातील प्रत्येक पात्र, त्याची बॉडी लँग्वेज प्रेक्षकांच्या परिचयाची आहे. त्यामुळे या पात्रांची जमून आलेली केमेस्ट्री 'गोलमाल'च्या सीक्वेलमध्ये दिसून आली होती. आता याचा पाचवा भाग बनणार ही कल्पनाच प्रेक्षकांना आनंद देणारी ठरु शकते.