ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या रायला बनायचं होतं डॉक्टर, पण एका घटनेनं तिचं सर्व आयुष्यच बदलून गेलं - AISHWARYA RAI BIRTHDAY

Aishwarya Rai birthday : ऐश्वर्या रायची अभिनेत्री म्हणून तिची कारकिर्द गाजलेली असली तरी तिला डॉक्टर बनायचं होतं. तिच्या वाढदिवशी जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी.

Aishwarya Rai birthday
ऐश्वर्या राय ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 1, 2024, 1:25 PM IST

मुंबई - अभिषेक बच्चनची पत्नी, बच्चन परिवाराची सून, आराध्याची आई आणि राय कुटुंबाची कन्या म्हणून आपल्या सर्व जबादाऱ्या पार पाडत असलेली ऐश्वर्या राय जगातील सर्वात सुंदर व्यक्ती ठरली होती. तिनं 1994 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा ताजही जिंकला होता. त्यानंतर गेल्या 3 दशकात ती चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून सक्रिय असून अनेक सुपरहिट चित्रपटही तिच्या नावावर आहेत. पण ऐश्वर्याला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण ती सिनेक्षेत्राकडं कशी वळली याबद्दल जाणून घेऊयात.

ऐश्वर्या राय ज्युनियर कॉलेजला असताना एका फोटो जर्नालिस्ट असलेल्या प्राध्यापकानं तिला तिला फॅशन फीचरसाठी निवडलं आणि तिचा ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश झाला. यानंतर तिला या करिअरमध्ये अनेक संधी दिल्या. मात्र, ऐश्वर्याला मनोमन डॉक्टर व्हायचं होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीनं शोबिजमध्ये प्रवेश करण्याबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली की याची सुरुवात तिच्या ज्यनियर कॉलेजला असतानाच्या दिवसात झाली. आपल्या कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीत नसल्याचा खुलासा तिनं केला. त्यामुळेच तिचं संपूर्ण लक्ष अभ्यासावर होतं. कठोर परिश्रम करून पदवी मिळवून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू असं त्याकाळात तिनं ठरवलं होतं.

1994 मध्ये ऐश्वर्यानं मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. त्यानंतर 1997 मध्ये मणिरत्नम यांच्या 'इरुवर' चित्रपटातून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर, तिनं मागं वळून पाहिलं नाही . तिनं आपल्या कारकिर्दीत और प्यार हो गया, हम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश, मोहब्बतें, ए दिल है मुश्किल, गुरु, जोधा अकबर, पोन्नियांन असे अनेक चित्रपट दिले आहेत.

ऐश्वर्या राय बच्चननं 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि 2011 मध्ये तिला आराध्या ही मुलगी झाली. गेल्या काही वर्षांपासून, ऐश्वर्याच्या सासरच्या लोकांशी मतभेद असल्याच्या अफवा ऑनलाइन पसरल्या आहेत, तरीही ऐश्वर्या किंवा तिच्या दोन्ही कुटुंबाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवाही सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. येत्या काळात त्यात किती तथ्य आहे हे समजेल. परंतु एक यशस्वी अभिनेत्री म्हणूनच ती आज सिनेक्षेत्रात ओळखली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.