ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्यानं न्यूयॉर्क व्हेकेशन केला एन्जॉय, मुंबई विमानतळावर झाल्या स्पॉट - aishwarya rai bachchan video - AISHWARYA RAI BACHCHAN VIDEO

Aishwarya Rai and Aaradhya : ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन आज सकाळी मुंबई विमानतळावर दिसल्या. यावेळी त्यांना पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. आता त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Aishwarya Rai and Aaradhya
ऐश्वर्या राय आणि आराध्या (ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 2:35 PM IST

मुंबई - Aishwarya Rai and Aaradhya : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन या नेहमीच चर्चेत असतात. आता दोघीही न्यूयॉर्कमधील व्हेकेशन एन्जॉय करून मुंबईत परतल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी सकाळी ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्या. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चनच्या नात्यात कटुता आल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या अनेक ठिकाणी आपल्या मुलीबरोबर फिरताना दिसते. याआधी या दोघीही अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसल्या होत्या. या लग्नाच्या पार्टीमध्ये अभिषेक बच्चन वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन, बहीण श्वेता बच्चन नंदा, निखिल नंदा आणि त्यांची दोन मुले नव्या आणि अगस्त्य नंदा यांच्याबरोबर आला होता.

ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडिओ व्हायरल : अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पार्टीपासूनचं ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये ठीक नसल्याच्या अफवा उडू लागल्या. दरम्यान सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या पापाराझीकडे पाहून हसतात. यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक ऐश्वर्याला "गुड मॉर्निंग" असं म्हणतात, मग तिला, "मॅडम, कशा आहात?" विचारतात यावर ती हसत उत्तर देत म्हणते, "गुड मॉर्निंग' सगळं ठीक आहे, धन्यवाद." दरम्यान दोघींच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर , ऐश्वर्यानं एअरपोर्ट लूकसाठी ऑल ब्लॅक आउटफिट घातला होता, तर आराध्यानं लव्हेंडर स्वेटशर्ट आणि ब्लॅक ट्राउझर्स परिधान केला होता.

ऐश्वर्या राय बच्चनचं वर्कफ्रंट : ऐश्वर्या आणि आराध्या गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये होत्या. या दोघींचे एकत्र व्हेकेशन एन्जॉय करत असतानाचे काही सोशल मीडिया फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये ऐश्वर्या चाहत्याबरोबर फोटो क्लिक करताना दिसत होती. दरम्यान ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती अखेरचा मणिरत्नम यांच्या 'पोनियिन सेल्वन 1 आणि 2' या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर साऊथ स्टार त्रिशा कृष्णन, शोभिता धुलिपाला, विक्रम आणि कमल हासन हे आदी झळकले होते.

हेही वाचा :

  1. बच्चन सदस्यांना घेऊन बनवायचा होता मुघल-ए-आझम, प्रपोजलवर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया - Mughal E Azam Remake
  2. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा? ज्यु. बच्चननं घटस्फोटाच्या पोस्टला केलं लाईक - abhishek bachchan and aishwarya rai
  3. ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या वयाच्या 13 व्या वर्षी झाली समजूतदार, पापाराझीला म्हटली 'ही' गोष्ट - AISHWARYA RAI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.