ETV Bharat / entertainment

रोमँटिक हिरोच्या भूमिकेत अहान पांडेचे होणार पदार्पण, मोहित सूरी करणार दिग्दर्शन - अहान पांडे

अहान पांडे यशराज फिल्म्सच्या आगामी रोमँटिक चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे. एक रोमँटिक हिरो म्हणून त्याला सादर करण्याची जबाबदारी प्रॉडक्शन हाऊसने दिग्दर्शक मोहित सूरीवर सोपवली आहे.

Ahaan Panday
अहान पांडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 3:55 PM IST

मुंबई - अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे आगामी चित्रपटासह त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तयार झाला आहे. आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स (YRF) निर्मित चित्रपटातून तो एका प्रेमकथेतून पदार्पण करेल. 'आशिकी 2', 'एक व्हिलेन' आणि 'मलंग' यांसारख्या चित्रपटासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक मोहित सुरी या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

अहानच्या पदार्पणाची तयारी आदित्य चोप्राने काही काळापासून स्वतःच्या देखरेखीत केली आहे. यशराजनं त्याला त्याचे कौशल्य पणाला लावण्याची सर्वोत्तम संधी बहाल केलीय. इंडस्ट्रीच्या अंतर्गत माहितीनुसार, अहान पांडेचे हिंदी चित्रपटसृष्टीतील लॉन्चिंग एका तरुण अभिनेत्याचे अलिकडच्या वर्षांतील सर्वात आश्वासक पदार्पण मानलं जातंय. त्याला स्टार बनवण्याचा विडाच जणू यशराज बॅनरनं उचललाय.

यशराजच्या वतीनं अहानची ओळख मोहित सूरीशी करुन देण्यात आली आणि तो रोमँटिक नायिकाच्या भूमिकेसाठी योग्य वाटतो की नाही याचा शोध घेण्यात आला. मोहितच्या मार्गदर्शनाखाली, अहानने त्याच्या ऑडिशन आणि स्क्रीन टेस्टने सर्वांना प्रभावित केले आणि भूमिकेसाठी आवश्यक असलेले त्याने गुणदर्शन दाखवले. मोहित सूरी स्क्रीन प्रेझेन्ससह नवीन चेहऱ्यावर लक्ष्य केंद्रित करत, अहानला पडद्यावर एक उत्कृष्ट रोमँटिक नायक म्हणून सादर करण्यासाठी उत्सुक झालाय.

चित्रपटाच्या तयारीसाठी, अहान मोहित सुरीसोबत प्रेमकथेच्या आशयामध्ये मग्न होऊन काम करत आहे. शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे शूटिंग 2024 नंतर सुरू होणार आहे. अहानसह भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नावही अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. अभिनय कारकिर्दीला सुरू करण्यापूर्वी अहानने नेटफ्लिक्सच्या 4-एपिसोडच्या थरारक नाट्य असलेल्या 'द रेल्वे मॅन'मध्ये शिव रवैल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

यशराज फिल्म्सला अलिकडेच 50 वर्षे पूर्ण झालीत. आदित्य चोप्राच्या नेतृत्वाखाली बॅनर अतिशय दमदार वाटचाल करत आहे. अनेक नव्या संकल्पना या निर्मिती संस्थेमार्फत राबवल्या जातात. नव्या कालाकारांना संधी देण्याचा सिलसिला त्यांनी आजही सुरू ठेवलाय. अलिकडच्या काळात त्यांनी वाणी कपूर ( शुद्ध देसी रोमान्स ), रणवीर सिंग ( बँड बाजा बारात ), अनुष्का शर्मा ( रब ने बना दी जोडी ) , परिणीती चोप्रा ( इशकजादे ) आणि मानुषी छिल्लर ( 'पृथ्वीराज' ) या नव्या कालाकारांना पदार्पणाची संधी देऊन त्यांच्या करियरला गती दिली आहे.

हेही वाचा -

  1. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजेय पराक्रमाची गाथा 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज
  2. नेटफ्लिक्सवर 'मामला लीगल है' वेब सीरीज 'या' दिवशी होणार रिलीज
  3. व्हॅलेंटाईन डे निमित्त गौरी खाननं खास जोडप्यांसाठी उघडलं नवं रेस्टॉरंट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.