ETV Bharat / entertainment

'टायगर विरुद्ध पठाण' आमने सामने उभे करण्यापूर्वी आदित्य चोप्रा बनवणार नवीन चित्रपट? - यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्स

Yash Raj Films Spy Universe : यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्स चित्रपटांना भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचं यापूर्वी बॉक्स ऑफिसवर सिद्ध झालंय. दरम्यान 'टायगर विरुद्ध पठाण' या चित्रपटातून सलमान आणि शाहरुखला एकमेकांविरुद्ध सेट करण्याचेही निर्माता आदित्य चोप्राने ठरवलं आहे. तत्पूर्वी आणखी एका नव्या चित्रपटाची योजना यशराजच्या वतीने आखली जाणार आहे.

Tiger vs Pathaan
टायगर विरुद्ध पठाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 2:25 PM IST

मुंबई - Yash Raj Films Spy Universe : यशराज फिल्म्स निर्मित बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या सिनेमॅटिक विश्वातील 'टायगर' आणि 'वॉर' आणि 'पठाण' सारख्या फ्रँचायझी चित्रपटांच्या यशानंतर, निर्माता आदित्य चोप्रा या गुप्तचर विश्व चित्रपटाचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. लेटेस्ट माहितीनुसार आदित्य चोप्रा देखील 'टायगर' आणि 'पठाण' चित्रपटातील दोन पात्रांच्या सामन्यासाठी स्टेज सेट करण्यापूर्वी एक नवीन चित्रपट रिलीज करून यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या कथानकात एक नवीन घटक सादर करण्याची योजना बनवत आहे.

यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्स चित्रपटाच्या फ्रँचायझीला मिळालेला जगभरातील प्रतिसाद बॉक्स ऑफिस केलक्शनमधून दिसून आला आहे. आदित्यला या स्पाय युनिव्हर्सकडून सध्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी अपेक्षा आहेत आणि तो टाइमलाइनमध्ये एक नवीन ट्विस्ट जोडत आहे. आदित्यला भारतातील दोन सर्वात मोठे सिनेमॅटिक आयकॉन शाहरुख खान आणि सलमान खान यांचा मेगा क्लॅश सेट करायचा आहे. टायगर विरुद्ध पठाण हा यशराज फिल्म्सच्या गुप्तहोरांना एकमेकांशी जोडणारा चित्रपट असणार आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर फ्रँचायझी, एक था टायगर (2012) आणि टायगर जिंदा है (2017) पासून सुरू झाली आणि 2023 मध्ये 'टायगर 3' चित्रपटाच्या माध्यमातून ती सुरू राहिली आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम-स्टार 'पठाण' चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज झाला. 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणारा हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला होता.

विशेष म्हणजे, शाहरुख आणि सलमान यांनी अनुक्रमे 'पठाण' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमध्ये एकमेकांचे कॅमिओज केले होते. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्समधील नवीन चित्रपटांच्या संदर्भात अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

हेही वाचा -

  1. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू
  2. ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  3. शाहिद आणि क्रिती अभिनीत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' करत आहे संथ गतीनं कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.