मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांनी सौदी अरेबियामधील जेद्दामध्ये आयोजित रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यादरम्यान दोघेही हॉलिवूड स्टार्सबरोबर पोझ देताना दिसले. आता रेड सी फिल्म फेस्टिव्हलमधील या स्टार्सचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रेड सी फिल्म फेस्टिवल 9 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. आता श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर या कार्यक्रमामधील त्यांच्या लूकमुळे चर्चेत आले आहेत. रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये श्रद्धा एका बहु-रंगीत चमकदार गाउनमध्ये दिसली. यावेळी ती खूप सुंदर दिसत होती.
श्रद्धानं दिली हॉलिवूड स्टार अँड्र्यू गारफिल्डबरोबर पोझ : तर दुसरीकडे 'स्पायडर मॅन' स्टार फेम अभिनेता अँड्र्यू गारफिल्ड हा आइवरी सूट, चेक शर्ट आणि टाय परिधान करून रेड कार्पेटवर झळकला. आता श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये दोन्ही स्टार्स एकत्र फोटोसाठी पोझ देण्यापूर्वी शेकहॅन्ड करताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी थोड्या वेळ गप्पा मारल्या. याशिवाय या दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझही दिली. अँड्र्यू गारफिल्ड आणि श्रद्धा कपूरला एकत्र पाहून अनेकांना आनंद झाला आहे. रेड कार्पेटवर अनेक स्टार्सनं फोटोसाठी पोझ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे.
Shraddha Kapoor at the Red Sea International film festival 2024 in Jeddah ✨🥰#Shraddha #ShraddhaKapoor pic.twitter.com/OkKyVmunX0
— WV - Media (@wvmediaa) December 10, 2024
Ranbir Kapoor, Olivia Wilde at the 4th edition of the Red Sea International Film Festival#OliviaWilde #RanbirKapoor pic.twitter.com/E4bkl8Kwh8
— Celebrity Updates🧢 (@Shanznew) December 8, 2024
रणबीर आणि ऑलिव्हिया वाइल्ड : तसेच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमधील रणबीर कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात तो लाल रंगाच्या एथनिक सूट आणि काळ्या रंगाच्या सनग्लासेसमध्ये दिसत आहे. रेड कार्पेटवर पोहोचण्यापूर्वी रणबीरनं चाहत्यांबरोबर सेल्फी काढली. यानंतर तो पापाराझींना पोझ देण्यासाठी रेड कार्पेटवर गेला. यादरम्यान, हॉलिवूड अभिनेत्री ऑलिव्हिया वाइल्ड त्याला रेड कार्पेटवर भेटण्यासाठी आली. दोघांनी शेकहॅन्ड केला. यानंतर दोघांनी कॅमेऱ्यासाठी एकत्र पोझ दिली. रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरशिवाय आमिर खानही उपस्थित होता. आमिरला ऑनोरिस पुरस्कारानं या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं.
हेही वाचा :