ETV Bharat / entertainment

"अभी मैं जिंदा हूं", पूनम पांडेनं दिला जिवंत असल्याचा पुरावा, व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Poonam Pandey death news

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे जिवंत आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Poonam Pandey
Poonam Pandey
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 12:43 PM IST

Updated : Feb 3, 2024, 12:57 PM IST

मुंबई Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी 2 फेब्रुवारीला सकाळी आली होती. तिच्या व्यवस्थापन टीमनंही मृत्यू झाल्याचं जाहीर केलं होतं. याचं कारण 'सर्वायकल कॅन्सर' असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराची कोणतीही बातमी आली नाही. तसेच तिच्या कुटुंबीयांचाही पत्ता नव्हता. आता पूनमनं एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. होय पूनम पांडे जिवंत आहे!

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला : पूनम पांडेनं तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये ती पूर्णपणे स्वस्थ दिसत आहे. ती म्हणाली की, "मी जिवंत आहे. मी सर्वायकल कॅन्सरनं मरण पावली नाही. दुर्दैवानं, सर्वायकल कॅन्सरशी लढताना ज्या हजारो महिलांनी आपलं प्राण गमावलं, त्यांच्यासाठी मी हे म्हणू शकत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते की इतर कोणत्याही कर्करोगाच्या विपरीत, सर्वायकल कॅन्सरवर मात करणं शक्य आहे. तुम्हाला फक्त तुमच्या चाचण्या कराव्या लागतील आणि HPV लस घ्यावी लागेल".

सोशल मीडियावर माफी मागितली : पूनम पांडेचा हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावरून तिला खूप ट्रोल केलं जातंय. पूनमनं तिच्या मृत्यूबाबत खोटं बोलल्यानंतर सोशल मीडियावर माफीही मागितली आहे. मी हे सर्व 'सर्वायकल कॅन्सर' विषयी जागरूकता पसरवण्यासाठी केलं, असं ती म्हणाली. पूनम पांडेच्या मॅनेजरनं काल सांगितलं होतं की, "मृत्यूची बातमी खरी असून तिच्या कुटुंबीयांकडून ही बातमी मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ गावी ती कर्करोगावर उपचार घेत होती आणि तिथेच तिचा मृत्यू झाला."

बॉडीगार्डलाही माहिती नव्हती : पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती. तिच्या जवळच्या लोकांनाही यावर विश्वास बसणं कठीण जात होतं. बातमीनंतर, पूनम पांडेचं कुटुंबही बेपत्ता होतं. तसेच तिच्या बॉडीगार्डलाही तिच्या आजारपणाची आणि मृत्यूची माहिती नव्हती. ही बातमी ऐकून त्यालाही धक्का बसला होता. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच्याच एका व्हिडिओत पूनम पार्टी करताना दिसली होती.

हे वाचलंत का :

  1. पूनम पांडेला झालेला 'सर्वायकल कॅन्सर' नेमका काय असतो? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

Last Updated : Feb 3, 2024, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.