ETV Bharat / entertainment

'बालिका वधू' फेम अविका गोरनं 'या' चित्रपटातून केलं होत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण - avika celebrating her birthday - AVIKA CELEBRATING HER BIRTHDAY

Avika Gor Birthday : अभिनेत्री अविका गोर आज 30 जून रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. आता अनेकजण तिला या खास प्रसंगी शुभेच्छा देताना दिसत आहे.

Avika Gor Birthday
अविका गोरचा वाढदिवस (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 3:28 PM IST

मुंबई Avika Gor Birthday : 'बालिका वधू' फेम अविका गोर आज 30 जून रोजी आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. तिनं टेलिव्हिजन जगतात खूप कमी वयात नाव कमावलं आहे. 'बालिका वधू'मध्ये आनंदीची भूमिका साकारल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. तिला 2009 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार श्रेणीमध्ये राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. 'ससुराल सिमर का'मध्ये रोलीची भूमिका साकारल्यानंतर तिला एक नवीन ओळख मिळाली. 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'उय्याला जंपला' या चित्रपटाद्वारे तिनं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यासाठी तिला पदार्पणासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एसआयआयएमए (SIIMA ) पुरस्कार मिळाला.

अविका गोरनं सांगितलं वाढत्या वजनाबद्दल : तिनं '1920 हॉरर्स ऑफ द हार्ट' आणि 'राजू गारदी 3'मध्ये भुताची भूमिका केली. तिनं अनेक रोमँटिक चित्रपट आणि वेब सीरीजही केल्या आहेत. आता ती बी-टाऊनमध्येही तिच्या अभिनयामुळे चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी ती तिच्या वाढत्या वजनाबद्दल उघडपणे बोलली. आता ती पूर्णपणे फिट दिसू लागली आहे. आजकाल अविका तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. दरम्यान वाढदिवसाच्या खास प्रसंगी अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या चाहत्याबरोबर सुंदर फोटो शेअर करत असते. याशिवाय ती अनेकदा पार्ट्यांमध्ये आपल्या मित्र -मैत्रिणीबरोबर देखील दिसते.

अविका गोर टीव्ही आणि चित्रपट कारकिर्द : अविका गोरनं तिच्या करिअरची सुरुवात 'बालिका वधू'मधून केली आणि नंतर दीपिका कक्करबरोबर ती 'ससुराल सिमर'मध्ये दिसली. 'झलक दिखला जा 5' आणि 'खतरों के खिलाडी 9' या रिॲलिटी शोमध्येही तिनं प्रेक्षकांच खूप मनोरंजन केलं होतं. तिनं 'पाठशाला' आणि 'तेज' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय. दरम्यान तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरत 'आमरण' या तेलुगू चित्रपटामध्ये अभिनेता आदि साईकुमारबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन साऊथ दिग्दर्शक बलवीर करणार आहे. हा चित्रपट डिसेंबर 2024मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं समजत आहे.

हेही वाचा :

  1. सेलिब्रिटींकडून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव, पहा कोण काय म्हणाले? - INDIA T20 WORLD CUP WIN
  2. विराटच्या डोळ्यात पाणी आल्यावर मुलगी वाल्मिकाला काय सांगितलं? अनुष्का शर्मानं शेअर केली पोस्ट - Anushka Sharma Shares post
  3. 'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के पूर्ण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक - kalki 2898 ad part 2

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.