ETV Bharat / entertainment

अथिया शेट्टीनं आयपीएल 2024 सामन्यात सीएसके विरुद्ध केएल राहुलच्या स्मॅशिंग परफॉर्मन्सचे फोटो केले शेअर - ATHIYA SHETTY SHARE PIC - ATHIYA SHETTY SHARE PIC

Athiya Shetty And KL Rahul : अथिया शेट्टीनं सीएसके विरुद्ध केएल राहुलच्या उत्तम कामगिरीचा फोटो शेअर केलाय. राहुलनं या सामन्यात 8 विकेट राखून शानदार विजय मिळवला आहे.

Athiya Shetty And KL Rahul
अथिया शेट्टी आणि केएल राहुल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 5:20 PM IST

मुंबई - Athiya Shetty And KL Rahul : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अथिया तिच्या पोस्टमुळे अनेकदा चर्चेत येत असते. दरम्यान, तिनं एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये अथियानं पती केएल राहुलबरोबरचा फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये राहुल हा क्रिकेट ग्राउंडवर खेळताना दिसत आहे. आयपीएल 2024 मध्ये काल लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला होता. लखनौचा संघामधील कर्णधार केएल राहुलनं या सामन्यात आपल्या संघाला 8 विकेट राखून शानदार विजय मिळवून दिला.

केएल राहुलची फलंदाजी : अथियानं केएल राहुलचा एक फोटो शेअर करत त्यावर लिहिलं, 'केएल राहुल आज रात्री 31 चेंडूत 53 धावा.' याशिवाय तिनं हार्ट इमोजी देखील या पोस्टला जोडला आहे. राहुलची मॅचविनिंग इनिंग पाहून ती खूश झाल्याचं या पोस्टवरून स्पष्ट दिसत आहे. अथिया अनेकदा आपल्या पतीबोरबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. याशिवाय हे जोडपे अनेकदा धार्मिक स्थळी देखील जाताना दिसतात. सध्या अथिया ही बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. दरम्यान अथिया शेट्टीनं केएल राहुलबरोबर 23 जानेवारी 2023 रोजी लग्न केलं होतं. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अथिया राहुल बद्दल : सुनील शेट्टी यांच्या मुलीचे लग्न त्यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात होतं. अथिया शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2025 मध्ये 'हीरो' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर सूरज पंचोली दिसला होता. त्यानंतर ती 2017 मध्ये 'मुबारकां' चित्रपटात दिसली. अथिया शेवटी 2019 मध्ये 'मोतीचूर चकनाचूर'मध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी होता. मोतीचूर चकनाचूर' चित्रपटापासून अथिया चित्रपट जगतापासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

हेही वाचा :

  1. न्यासा देवगणच्या वाढदिवशी काजोलनं शेअर केले हृदयस्पर्शी क्षण - Nysa Devgan birthday
  2. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan
  3. राजकुमार राव यांनी प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले, केला 'या' गोष्टीचा खुलासा - Rajkummar Rao

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.