मुंबई - 'व्हॅलेंटाईन्स डे' अगदी जवळ येत असल्याने शेमारू मराठीबाणाच्या 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मालिकेमधील कलाकार तन्वी किरण (मानसीची भूमिका साकारणारी) आणि प्रदीप घुले (प्रतापची भूमिका साकारणारा), त्यांच्यासाठी या खास दिवसाचा अर्थ काय आहे याबद्दल मोकळेपणानं सांगितलं. प्रेम आणि कनेक्शनबद्दल त्यांचे विचार आणि भावना खूपच रंजक आहेत.
तन्वी किरण म्हणाली, "माझ्यासाठी 'व्हॅलेंटाइन्स डे' हा रोमांटिक उपहारांपेक्षा जास्त आहे. ज्या लोकांवर आणि प्राण्यांवर मी प्रेम करते त्या सर्वांसोबत ही दिवस साजरा करण्याची ही एक संधी आहे. मी कोणत्या तरी एका दिवशी प्रेम व्यक्त करण्यापेक्षा दररोज प्रेम व्यक्त करण्यावर विश्वास ठेवते आणि व्हॅलेंटाईन्सचा दिवस एक छान आठवण म्हणून काम करते. कुटुंबीय, मित्र असो किंवा मला आवडत असलेल्या प्राण्यांवर प्रेमाचा वर्षाव करणे, हे सर्व कृतज्ञतेबद्दल आहे आणि प्रत्येकाला मूल्यवान वाटणे आहे. मिठी मारणे, प्रेमानं गोड शब्द बोलणं हे माझ्यासाठी 'व्हॅलेंटाईन्स डे'चं सार आहे."
प्रदीप घुले आपले मत व्यक्त करताना म्हणतो, "माझा विश्वास आहे की केवळ १४ फेब्रुवारीच नाही तर वर्षातील प्रत्येक दिवस प्रत्येकाने 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणून साजरा केला पाहिजे. तुमचा व्हॅलेंटाइन तुमची आई, भाऊ किंवा वडील असं तुमच्या जवळचं कोणीही असू शकतं. आजच्या धावपळीच्या जीवनात, लोक सहसा कामात गुंतलेलं असतात. त्यामुळे मला वाटतं की, या दिवशी आपण आपल्या व्यग्र वेळापत्रकातून विश्रांती घेतली पाहिजे आणि आपल्या प्रियजनांसोबतचे क्षण जपले पाहिजेत."
‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या मालिके मधील या दोघांचा हा मनस्वी दृष्टीकोन प्रेम रोमँटिक नातेसंबंधांच्या पलीकडे जाणारा आहे. आपल्या हृदयात विशेष स्थान असलेल्या सर्वांचे कौतुक करण्याचा आणि त्यांच्याशी जोडण्याचा हा दिवस आहे.
ही मालिका 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' द्वारे प्रेमाची ऊब पसरवत आहे. प्रत्येकाने या 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या क्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन कलाकारांनी केलंय. ही मालिका शेमारू मराठीबाणावर प्रसारित होत असते.
हेही वाचा -