ETV Bharat / entertainment

अभिनेत्री-गायिका मलिका राजपूतचा रहस्यमय मृत्यू, आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय - मलिका राजपूत

अभिनेत्री-गायिका मलिका राजपूत मंगळवारी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Malika Rajput
मलिका राजपूतचा रहस्यमय मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 3:44 PM IST

मुंबई - प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मलिका राजपूत हिचे मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत निधन झाल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील एका खोलीत सापडला होता. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अभिनेत्री मलिका राजपूतला विजय लक्ष्मी या नावानंही ओळखलं जातं.

प्रख्यात गायिका आणि अभिनेत्री मलिका राजपूतचा मृतदेह कोतवाली नगर येथील सीताकुंड परिसरात तिच्या राहत्या घरी आढळून आला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून, शेजारी आणि प्रेक्षकही घटनास्थळी जमा झाले आहेत. या कठीण काळात ते मलिकाच्या आईला दिलासा देत आहेत. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, त्यांनी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली आणि त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची व्यवस्था केली.

मृताची आई सुमित्रा सिंह यांनी आपल्याला प्रचंड धक्का बसल्याचं सांगितलं आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांना पूर्णपणे माहिती नव्हतं. त्या म्हणाल्या, "दार बंद होते, आणि दिवे चालू होते. आम्ही दार उघडण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही. शेवटी मी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि ती तिथे उभी असलेली दिसली. मी दार ठोठावले तेव्हा मला आढळलं की आमची मुलगी लटकत होती. मी ताबडतोब माझ्या पतीला आणि इतरांना फोन केला, पण खूप उशीर झाला होता," असं मलिका राजपूतच्या आईने मीडियाला सांगितलं.

पोलीस अधिकारी श्रीराम पांडे यांनी संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केले आणि असे सुचवले की प्राथमिक पुरावे पाहता ही आत्महत्येचं प्रकरणं असावं असं वाटतंय. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे. पुढील तपास आणि कृतीची दिशा या अहवालानंतर निश्चित ठरणार आहे.

मलिका राजपूतने कंगना रणैतसह केले होते काम - प्रसिद्ध गायिका मलिका राजपूत उर्फ लक्ष्मी विजयनं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसह काम केलं होतं. तिनं आपल्या आवाजानंही लोकांची मनं जिंकली होती. तिच्या 'यारा तुझे' या म्यूझिक अल्बमला भरपूर प्रसिद्ध मिळाली होती. याबरोबरच मलिकानं वेब सिरीज आणि अल्बमध्येही आपला जलवा दाखवला होता. इतरही अनेक कारणामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात होती.

हेही वाचा -

  1. 'शैतान'मधील 'खुशियां बटोर लो' गाण्याचा टीझर उद्या होणार रिलीज
  2. वरूण तेजनं 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'साठी रुहानी शर्माचं केलं स्वागत
  3. केट ब्लँचेट, डेव्हिड बेकहॅमसह 'बाफ्टा अवॉर्ड्स'मध्ये प्रेझेन्टर म्हणून सामील होणार दीपिका पदुकोण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.