ETV Bharat / entertainment

शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर 'करण अर्जुन' होणार जगभरात रि- रिलीज, जाणून घ्या तारीख

शाहरुख खान आणि सलमान खान यांचा 'करण अर्जुन' हा चित्रपट रि- रिलीज होणार आहे. याबद्दल सलमान खाननं पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

shah rukh khan and salman khan
शाहरुख खान आणि सलमान खान (रि-रिलीज होत आहे 'करण-अर्जुन (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 28, 2024, 2:25 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर चित्रपट 'करण अर्जुन' अनेकांना थिएटरमध्ये पाहता आला नाही, आता त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 'करण अर्जुन' 29 वर्ष जुना चित्रपट आता पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'करण अर्जुन'चे दिग्दर्शक आणि हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन त्यांचा कल्ट क्लासिक चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आज 28 ऑक्टोबर रोजी सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ही आनंदाची बातमी दिली आहे. 'भाईजान'नं या पोस्टमध्ये लिहिलं, 'राखी जिनं चित्रपटात अगदी बरोबर सांगितलं होतं की, माझे करण अर्जुन येईल... 22 नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहात.'

करण-अर्जुन चित्रपट होईल रि- रिलीज : आजकाल सलमान खानची सुरक्षा अतिशय कडक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान तरीही चित्रपट आणि 'बिग बॉस 18'ची शूटिंग करत आहे. दरम्यान 'करण अर्जुन'च्या कहाणीबद्दल सांगणायचं झालं तर अतिशय हृदयस्पर्शी, भावनिक आणि थरारक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं अर्जुनची तर सलमान खाननं करणची भूमिका साकारली होती. याशिवाय राखीनं चित्रपटात करण-अर्जुनच्या आईची उत्तम भूमिका साकारली. 'करण अर्जुन' चित्रपटात दिवंगत अभिनेता अमरीश पुरीनं ठाकूर दुर्जन सिंग नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती.

'करण अर्जुन'ची कहाणी : या चित्रपटात दुर्जन सिंग राखीच्या करण आणि अर्जुनला मारतो. यानंतर करण आणि अर्जुनचा पुनर्जन्म होतो. अर्जुनला त्याच्या मागील जन्माची स्वप्न दिसत असते. यानंतर तो आधीच्या जन्मात जिथे होता, तिथे तो त्याचा मित्र जॉनी लीव्हरबरोबर जातो. इथे पोहोचल्यावर शाहरुख खानला स्वत:च्या आणि आपला भाऊ करणच्या मृत्यूचा खेळ समजतो. यानंतर तो करणला या गावात घेऊन येतो आणि त्याला पूर्वीच्या जन्माबद्दल सांगतो. यानंतर राखीचे करण आणि अर्जुन त्याच्या मृत्यूचा बदला घेतात. 'करण अर्जुन' हा चित्रपट खूप मनोरंजक आहे, आता हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहांमध्ये पाहू शकाल. आता सलमाननं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त करत आहे.

हेही वाचा :

  1. लॉरेन्स बिश्नोईच्या जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खाननं दुबईमध्ये 'दा बँग' टूरची केली घोषणा
  2. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खाननं बिश्नोई समुदायाला धनादेश देऊ केला? काय आहे प्रकरण जाणून घ्या...
  3. शाहरुख खान सेंस ऑफ ह्यूमर जबरदस्त, वाचा सुंदर विनोद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.