मुंबई - Stree 2 and Veda : अभिनेता अभिषेक बॅनर्जीनं अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयानं त्यानं बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान त्याचे दोन चित्रपट 'स्त्री 2' आणि 'वेदा' हे एकाच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. यावर आता अभिषेक म्हटलं, "दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणे अवास्तव वाटते. हे बॉक्स ऑफिसवर स्वतःशीच संघर्ष करण्यासारखे आहे. 'माझ्या हृदयाच्या जवळ कोणता चित्रपट आहे, हे मी निवडू शकत नाही. कारण ते तुमच्या आई आणि वडिलांमध्ये तुम्हाला कोण जास्त आवडते हे ठरवण्यासारखे आहे. "
अभिषेक बॅनर्जीचे दोन चित्रपट : त्यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "माझ्या चाहत्यांसाठी एकाच दिवशी, माझ्या दोन वेगवेगळ्या बाजू पाहण्याची ही उत्तम संधी आहे." राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2' एक हॉरर कॉमेडी आहे, तर जॉन अब्राहम स्टारर 'वेदा' एक जबरदस्त ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अभिषेकबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा जन्म 5 मे 1985 रोजी पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे झाला, त्याचं शिक्षण दिल्लीतून झाले. शालेय जीवनात तो डीडी शोही करत होता. याशिवाय त्यानं दिल्लीत थिएटरही केले आहे. आमिर खान स्टारर 'रंग दे बसंती' या चित्रपटातून त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
अभिषेक बॅनर्जीनं केलं 'या' चित्रपटांमध्ये काम : अभिषेक अभिनेता असण्यासोबतच कास्टिंग डायरेक्टर देखील आहे. त्यानं 'नॉक आऊट', 'द डर्टी पिक्चर', 'नो वन किल्ड जेसिका', 'बजाते रहो', 'डियर डॅड दो लफ्जों की कहानी', 'रॉक ऑन 2', 'उमरिका', 'गब्बर', 'इज बॅक', 'कलंक', 'ओके जानू', 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'मिकी व्हायरस'मध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्यानं काम केलंय. 'फिल्लौरी', 'अज्जी', 'स्त्री', 'अर्जुन पटियाला', 'ड्रीम गर्ल', 'बाला', 'मेड इन चायना', 'अपूर्व' आणि 'भेडिया' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. याशिवाय तो 'मिर्झापूर', 'पाताळ लोक', 'राणा नायडू', 'काली', 'टाइपरायटर', 'आखरी सच' यांसारख्या वेब सीरीजमध्ये त्यानं काम केलंय.
हेही वाचा :