मुंबई - Junaid Khan OTT debut : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानचा मुलगा जुनैद खान ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'महाराजा' या पहिल्या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली. जुनैद खानच्या पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आमिर खानच्या लाडक्या मुलाला पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. अखेर त्यासाठीची प्रतीक्षा संपली आहे. 'महाराजा' चित्रपटाच्या ओटीटी प्रसारणाची तारीख जाहीर झाली आहे.
या दिवशी प्रदर्शित होणार जुनैद खानचा 'महाराजा'
'महाराजा'मध्ये शर्वरी, जयदीप अहलावत आणि शालिनी पांडे यांच्याही विशेष भूमिका आहेत. 'द रोमँटिक्स' आणि 'द रेल्वे मन' नंतर यशराज फिल्म्सचा हा तिसरा डायरेक्ट-टू-डिजिटल प्रोजेक्ट असेल. चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्ण झालं आणि त्यानंतर लगेचच, निर्मात्यांनी नेटफ्लिक्सवर चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा झाली आणि आता बातम्यांनुसार, जून 2024 मध्ये 'महाराजा' प्रदर्शित करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जुनैद खानचा 'महाराज' 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
जुनैद खानचा दुसरा चित्रपटही रिलीजसाठी तयार आहे
'महाराजा' चित्रपटाचा ट्रेलर 5 जूनच्या आसपास प्रदर्शित होईल. त्यानंतर 9 दिवसांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल. 'महाराजा' या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा करत आहेत. यापूर्वी त्यानं यशराज फिल्म्ससाठी राणी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटाचं शेवटचे दिग्दर्शन केलं होतं. 'महाराजा'मध्ये शर्वरी, जयदीप अहलावत आणि शालिनी पांडे यांच्याही विशेष भूमिका आहेत. चित्रपटात जुनैद एका पत्रकाराच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे, जो सत्तेत असलेल्यांचा सामना करतो. त्याच्याकडे 'लव्ह टुडे' चित्रपटाचा रिमेक देखील रिलीजसाठी तयार आहे या चित्रपटाची निर्मितीही आमिर खाननं केली आहे.
हेही वाचा -