ETV Bharat / entertainment

आमिर खानचा मुलगा जुनैदनं 'महाराज' चित्रपटातून केलं पदार्पण, बहीण इरा आणि मेव्हणा नुपूरची प्रतिक्रिया - Maharaj release - MAHARAJ RELEASE

Maharaj release : इरा खान आणि तिचा नवरा नुपूर शिखरे यांनी नुकतीच जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक केल्याचं दिसतंय.

Aamir Khan son Junaid
आमिर खानचा मुलगा जुनैद ((IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Maharaj release : आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी इरा खाननं या वर्षी जानेवारीमध्ये तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्न केलं होतं. हे जोडपं अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करताना दिसतं आणि अनेक बातम्यात झळकतं. पण यावेळी इरा आणि नुपूरनं त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जुनैद खानच्या पहिल्या चित्रपटाचं कौतुक केलं. जुनैदनं बॉलिवूडमधील आपली अभिनयाची इनिंग 'महाराज' चित्रपटाबरोबर सुरू केली आहे.

Aamir Khan son Junaid
जुनैद खानच्या चित्रपटाचं कौतुक (Aamir Khan son Junaid)

इरा-नुपूरनं 'महाराज'चं केलं कौतुक

जुनैद खानची बहीण इरा खान आणि तिचा पती नुपूर शिखरे त्याच्यासाठी समर्थनार्थ उतरल्या. अनेक अडथळ्यानंतर जुनैदचा 'महाराज' चित्रपट शेवटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. इरानं जुनैदच्या पहिल्या 'महाराज' चित्रपटाचं पोस्टर तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे आणि तिच्या फॉलोअर्सना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली. इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाची एक झलक शेअर करताना इरानं लिहिलं, 'चला पाहूया'. नुपूर शिखरेनं 'महाराज'ची एक क्लिप शेअर केली.

Aamir Khan son Junaid
जुनैद खानच्या चित्रपटाचं कौतुक (Instagram)

कोर्टाने 'महाराज' चित्रपटाला क्लीन चिट दिली

सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​दिग्दर्शित, 'महाराज' या चित्रपटाचा आधी 14 जून रोजी OTT प्रीमियर होणार होता. मात्र, विश्व हिंदू परिषदेनं या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर 'महाराज'चं प्रदर्शन रोखण्यात आलं. यामुळे काही प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं संघटनेनं म्हटलं होतं. गुजरात उच्च न्यायालयानं आता 'महाराज' चित्रपटाला प्रदर्शनासाठी क्लीन चिट दिली असून हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

2 जून रोजी इरा खाननं तिचा भाऊ जुनैदच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यांच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, भाऊ-बहीण जोडी सेल्फीसाठी पोज देताना दिसत होती. दोघेही कॅमेऱ्यासमोर हसताना खूपच क्यूट दिसले. दुसऱ्या एका फोटोत जुनैद त्याच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. यावेळी इराने जुनैदसाठी एक सुंदर कॅप्शन लिहून आपला भाऊ कसा मोठा झाला यावर सविस्तरपणे लिहिलं होतं.

हेही वाचा -

  1. महाराज X रिव्ह्यू : जुनैद खाननं पदार्पणातच जिंकली प्रेक्षकांची मनं, जयदीप अहलावतच्या कामावर नेटिझन्स फिदा - Maharaj X Review
  2. अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह जोगेश्वरीतून अटक - Theft at Anupam Kher office
  3. सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो आले समोर - Sonakshi Sinha Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.