मुंबई Aamir Khan : हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाद्वारे सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. नुकताच आमिर खान 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाला होता. यावेळी आमिरनं मनोरंजक गोष्टी सांगितल्या. त्यानं पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ताबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आमिरला विचारण्यात आलं की, तो लोकांचे वागणं नेहमीच नोटीस करत असतो. यानंतर लगेच आमिरनं त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ताशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला. तो म्हणाले, "माझा मोठा मुलगा जुनैदचा जन्म होणार होता. त्यावेळी रीनाला खूप प्रसूती वेदना सुरू होत्या. आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. एक चांगला पती म्हणून मी तिच्याबरोबर ब्रीदिंग एक्सरसाइज करत होतो. त्यावेळी खूप वेदना होूऊ लागल्या. यानंतर मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मग तिनं मला एक कानशीलात लगावली. यानंतर तिनं मला निरर्थक बोलणे बंद करण्यास सांगितलं."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आमिर खान केला खुलासा : याशिवाय पुढं त्यानं सांगितलं होतं की, "रीनाला खूप वेदना होत होत्या. तेव्हा तिनं माझा हात चावला होता. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, रीनाला खूप वेदना होत होत्या. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव खूप वेगळे होते. जेव्हा रीना जुनैदला घरी घेऊन आली, तेव्हा ती माझ्यावर खूप रागावली होती." आमिर खान आणि रीना दत्ताचा घटस्फोट लग्नाच्या 16 वर्षानंतर झाला होता. आमिर आणि रीना यांना दोन मुले आहेत. आमिरची मुलगी आयरा खानचं लग्न नुकतेच झालं आहे. रीना दत्तापासून विभक्त झाल्यानंतर आमिरनं किरण रावशी दुसरे लग्न केलं, पण हे नातेही फार काळ टिकलं नाही. 15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. किरण आणि आमिरला आझाद राव खान नावाचा मुलगा आहे.
आमिर खानचे आगामी चित्रपट : वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'लपता लेडीज' चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. माजी पत्नी किरण राव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. आमिर खान शेवटी 2022 साली 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसला होता आणि आता तो 'सितारे जमीन पर'मध्ये दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो.
हेही वाचा :
- रणबीर कपूरचा पायऱ्यांवरून खाली घसरत असताना व्हिडिओ झाला व्हायरल - ranbir kapoor
- 'पुष्पा 2' ते 'कल्की 2898 एडी'पर्यंत 'या' दक्षिणेकडील चित्रपटांची प्रेक्षकांना आहे प्रतिक्षा - upcoming most awaited south movies
- छत्तीसगढमध्ये लपलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी केली अटक; 40 तास केला पाठलाग, पोलीस कोठडीत रवानगी - Mahadev Betting App case