ETV Bharat / entertainment

नुकतंच लग्न झालेली आमिर खानची मुलगा आयरा वाटतेय एकटेपणाची भीती, इन्स्टावर पोस्ट करुन दिली भीतीची माहिती - Ira Khan - IRA KHAN

Ira Khan : आमिर खानची मुलगी आयरा खाननं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ira Khan
आयरा खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 7:01 PM IST

मुंबई - Ira Khan : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. अनेकदा ती स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्याबरोबर कनेक्डेट राहते. आता आयरानं शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये तिनं एकाकीपणाबद्दलची भीती व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये आयरा खाननं लिहिलं की, 'माझ्या आजूबाजूचे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात पण तरीही मला एकटे राहण्याची भीती सतावत आहे. मला असहाय्य होण्याची भीती वाटते, मला जगातील प्रत्येक वाईट गोष्टीची म्हणजेच हिंसा, रोग, क्रूरतेबाबत भीती वाटते.

आयरा खाननं केली भीती व्यक्ती : याशिवाय आयरानं पुढं सांगितलं, 'मला माझ्या आईला गमावण्याची भीती वाटते. माझ्या भीतीवर काहीही उपाय नाही. यानंतर मी एखादे गाणे किंवा चित्रपट पाहते. मला जेव्हा कोणी असं सांगतं की, सर्व काही ठीक आहे, त्यानंतर मला चांगलं वाटतं. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर आयरानं अशी पोस्ट शेअर करून चाहत्यांची चिंता वाढवली आहे. आता तिला अनेकजण विचारत आहे की, जर ती विवाहित आहे तर तिला एकटं का वाटत आहे. याआधी देखील आयरानं एका मुलाखतीत सांगितलं होत की, काही वर्षापूर्वी ती डिप्रेशनमध्ये होती. अनेकदा ती सोशल मीडियावर तिच्या भावना प्रकट करत असते. मात्र लग्नानंतर तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण तिच्याविषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न : या जोडप्यानं 3 जानेवारीला नोंदणीकृत विवाह केल्यानंतर 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूरच्या अरवली हिल हॉटेलमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा सोहळा बरेच दिवस चालला. या जोडप्याच्या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरलही झाले होते. आयरा आणि नुपूरचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. दरम्यान नुपूर शिखरे हा आमिर खानचा ट्रेनर होता. याशिवाय त्यानं सुष्मिता सेनला फिटनेसचं प्रशिक्षण दिलं आहे. या प्रशिक्षण सत्रांमध्ये तो आमिर खानच्या मुलीलाही भेटला होता. यानंतर त्यांची प्रेमकहणी सुरू झाली.

हेही वाचा :

  1. शमिता शेट्टीनं सुंदर पेंटिंग करताना व्हिडिओ केला शेअर, चाहत्यांनी केलं कौतुक - shamita shetty
  2. पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात, पाहा व्हिडिओ - Pushkar Jog
  3. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.