ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2 द रुल'मध्ये मोठा बदल, महत्त्वाच्या व्यक्तीनं सोडली दिग्दर्शकाची साथ - Pushpa 2 The Rule - PUSHPA 2 THE RULE

'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजसाठी अवघे काही महिने उरले आहेत. यापूर्वी या चित्रपटातील एका महत्त्वाच्या व्यक्तीनं चित्रपट मध्येच अर्धवट सोडला आहे.

Pushpa 2 The Rule
पुष्पा 2 द रुल (PushpaMovie X)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 5:39 PM IST

मुंबई - साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2 - द रुल'च्या रिलीजची प्रतीक्षा जोरदारपणे सुरू आहे. साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनचे चाहते 'पुष्पा 2- द रुल'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असून आता या चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांची अस्वस्थता आणखीनच वाढली आहे. आता 'पुष्पा 2 - द रुल'बाबत एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. 'पुष्पा 2 - द रुल' रिलीज होण्याआधीच एका महत्वाच्या तंत्रज्ञानं चित्रपटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

'पुष्पा 2 द रुल' कोणी सोडला?

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट बनवत आहेत आणि त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च आला आहे. 'पुष्पा 2 -द रुल' हा एक अ‍ॅक्शन पॅक्ड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं निश्चित झालंय. त्यापूर्वी चित्रपटाचे संकलक कार्तिक श्रीनिवास यांनी चित्रपट अर्धवट सोडला आहे. कार्तिक अनेक वर्षांपासून दिग्दर्शक सुकुमारसाठी काम करत आहे आणि आता क्रिएटिव्ह मतभेदांमुळे कार्तिकनं चित्रपट सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकच्या जागी नवीन नूली यांना 'पुष्पा 2- द रुल' या चित्रपटाचे संकलक म्हणून आणण्यात आलं आहे. ज्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांच्या संकलनाचं काम केलं आहे. 'पुष्पा 2 -द रुल' चित्रपटातील दुसरे गाणे 'अंगारों' रिलीज झालं याचं संकलनाचं काम नवीन नूली यांनी केलं आहे. नव्या पोस्टरच्या डिझाईनमध्येही त्यांचं श्रेय आहे.

हेही वाचा -

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाच्या चर्चेवर शत्रुघ्न सिन्हानं दिली प्रतिक्रिया - shatrughan sinha

'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'त्रिदेव' फेम सोनम खान करणार प्रवेश - Vishwatma Fame Sonam Khan

साऊथ सुपरस्टार दर्शनला हत्येप्रकरणी अटक, आरोपीच्या संपर्कात असल्याचा आरोप - Darshan arrested

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.