ETV Bharat / entertainment

'ट्वेल्थ फेल' स्टार विक्रांत मॅसीच्या घरी हलला पाळणा - ट्वेल्थ फेल

Vikrant Massey Become Father : 'ट्वेल्थ फेल' फेम विक्रांत मॅसीच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Vikrant Massey Become Father
विक्रांत मॅसी वडील झाला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:19 AM IST

मुंबई - Vikrant Massey Become Father : अभिनेता विक्रांत मॅसी सध्या त्याच्या 'ट्वेल्थ फेल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेतोय. विक्रांत मॅसीच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरनं 7 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला आहे. लग्नाच्या 2 वर्षानंतर विक्रांत वडील झालाय. विक्रांत मॅसी आणि शीतल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागताची घोषणा केली. 7 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर याबद्दल माहिती सांगत त्यानं लिहिलं, ''आम्ही एक झालो आहोत, आम्हा दोघांचे प्रेम असलेल्या आमच्या मुलाच्या आगमनाने आम्ही आनंदाने भरून गेलो आहोत.''

विक्रांत मॅसीनं शेअर केली पोस्ट : विक्रांतनं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कँडी, इंद्रधनुष्य, लहान शूज, फीडिंग बाटली आणि खेळणी यासारख्या गोंडस गोष्टी आहेत. लग्न करण्यापूर्वी विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूर यांनी काही वर्ष डेट केलं. लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलताना विक्रांतनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ''माझे वैवाहिक आयुष्य खूप चांगले जात आहे. होय, माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलेल्या आहेत. मी माझ्या जिवलग मित्राशी लग्न केलंय. मला नवीन घर मिळालं, त्यामुळे जीवन खूप चांगलं झालंय.'' या जोडप्याचं लग्न पारंपरिक पहाडी रितीरिवाजानं पार पडलं. 14 फेब्रुवारीला या जोडप्याच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण होत आहेत.

विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल' : विक्रांतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटात दिसला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. 'ट्वेल्थ फेल'ला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय विक्रांत मॅसीला या चित्रपटासाठी क्रिटिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा :

  1. 'घुंगराची चाळ' गाण्याचा टीझर रिलीज; पाहा व्हिडिओ
  2. आयुष्याच्या राईडमध्ये साथ दिल्याबद्दल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराने दिल्या एकमेकांना शुभेच्छा
  3. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजेय पराक्रमाची गाथा 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.