तिरुपूर Tiruppur Garment Manufacturing Hub : देशातील वस्त्र निर्यातीचं सर्वात मोठं केंद्र असलेल्या तिरुपूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग हबला सध्या लोकसभा निवडणुकीमुळं कामगारांची कमतरता भासत आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यातील कामगारांचा ओघ कमी झाला आहे आणि तिरुपूरमधील गारमेंट उत्पादन युनिटमध्ये काम करणारे कामगारही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या गावी परतत आहेत. कामगारांची कमतरता अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिका आणि युरोपमधून निर्यात ऑर्डर पुन्हा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
के. एम. तिरुपूर एक्सपोर्टर्स असोसिएशन (TEA) चे अध्यक्ष सुब्रमण्यम म्हणाले, “गेल्या काही वर्षांत, कोरोना महामारीमुळे आलेली आर्थिक मंदी, अमेरिका आणि युरोपीय आर्थिक मंदी, रशिया-युक्रेन युद्ध आणि परिणामी औद्योगिक मंदी हळूहळू बदलत आहे. आज तिरुपूरमध्ये व्यवसायाच्या अधिक संधी आहेत.“ ते पुढे म्हणाले, “विशेषतः, मोठ्या यूएस आणि युरोपियन किरकोळ विक्रेत्यांनी तिरुपूर गारमेंट निर्यातदारांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यास सुरुवात केली आहे. ज्या प्रमाणात ते महामारीपूर्वीच्या काळात देत होते, तशाच मोठ्या या ऑर्डर आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, बांगलादेशला “अत्यल्प विकसित राष्ट्र” चा लाभ मिळेल आणि ते युरोपमध्ये शुल्कमुक्त आयातीसाठी पात्र असतील. डिसेंबर 2027 पर्यंत त्यांना ही सुविधा आहे.
युरोपमधील मोठ्या कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिरुपूर गारमेंट निर्यातदारांसाठी ऑर्डर बुकची स्थिती सुधारत असल्याने मनुष्यबळाची मागणीही वाढली आहे. आजमितीस, टेलर, चेकर्स, सहाय्यक, प्रशासन, व्यापारी आणि इतरांना जास्त मागणी आहे. TEA अध्यक्ष म्हणाले की मोठ्या उत्पादन कंपन्या मर्यादित अनुभव असलेल्या लोकांना कामावर ठेवण्यास इच्छुक आहेत आणि काही तर अनुभवाशिवाय अकुशल लोकांना कामावर ठेवण्यास तयार आहेत. "कौशल्य-विकास केंद्राद्वारे ते अकुशल मनुष्यबळाला त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देतील आणि त्यांना नियमित कामगार म्हणून सामावून घेतील,". ते पुढे म्हणाले, “संपूर्ण तामिळनाडूमधून नोकरीच्या संधी शोधत असलेले बेरोजगार तरुण आमच्याशी संपर्क साधू शकतात. जर आम्हाला ते योग्य वाटले तर त्यांना आकर्षक पगार, मोफत भोजन आणि निवासासह नोकरीची हमी दिली जाईल.”
तिरुपूर हे 10,000 गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे हब आहे. येते 600,000 पेक्षा जास्त कामगार काम करतात जे होजरी, निटवेअर, कॅज्युअल वेअर आणि स्पोर्ट्सवेअर बनवतात. उल्लेखनिय बाब म्हणजे तिरुपूर देशाच्या कपड्यांच्या निर्यातीत 50 टक्क्यांहून अधिक योगदान देते.
हेही वाचा..