ETV Bharat / business

शेअर बाजारात मोठी तेजी: सेन्सेक्स 203 अंकांनी तर निफ्टी 24, 300 पार; स्टॉक मार्केट अपडेट - Stock Market Update

Stock Market Update : शेयर बाजारानं आज चांगलीच उसळी घेतल्याचं स्पष्ट झालं. आज सकाळी बीएसईवर सेन्सेस 203 अंकाच्या उसळीसह 80 हजार 190.04 वर उघडला. तर एएसईवर निफ्टी 0.34 टक्क्यांच्या वाढीवर 24 हजार 369.95 वर उघडला आहे.

Stock Market Update
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 1:36 PM IST

मुंबई Stock Market Update : स्टक मार्केटमध्ये मोठी उसळी असल्याचं आज सकाळी स्पष्ट झालं. या महिन्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी शेयर बाजाराची सुरुवात मोठ्या तेजीत झाली. बीएसईवर सेन्सेक्स 203 अंकाच्या उसळीसह 80 हजार 190.04 वर उघडला. तर दुसरीकडं एनएसईवर निफ्टी 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 24 हजार 369.95 वर उघडला. शेयर बाजारात तेजी असल्यानं गुंतवणूकदारांनी मोठा आनंद व्यक्त केला.

कोणाचे वाढले शेयर तर कोणाचे घसरले : आज शेयर बाजारात मोठी तेजी असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. आज शेयर बाजार उघडल्यानंतर बाजार उघडल्यानंतर ICICI बँक, Hindalco, HCL Tech, TCS आणि Tata Motors यांच्या शेयरमध्ये मोठी वाढ झाली आहे. या कंपन्याचे शेयर निफ्टीवर वाढीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडं HDFC बँक, सिप्ला, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस आणि HDFC लाइफ यांचे शेयर घसरले आहेत.

या बँकांचा सर्वाधिक लाभधारकांमध्ये समावेश : बुधवारी शेयर बाजार चांगल्या वाढीवर बंद झाला होता. यात BSE वर सेन्सेक्स 545 अंकांच्या उसळीसह 79 हजार 986.80 वर बंद झाला. तर NSE वर निफ्टी 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 24 हजार 286.50 वर बंद झाला. यावेळी एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि एसबीआयचा सर्वाधिक लाभधारकांच्या यादीत समावेश करण्यात आला. दुसरीकडं टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टायटन कंपनी आणि एल अँड टी या कंपन्यांचा सर्वाधिक नुकसान झालेल्या यादीत समावेश करण्यात आला. निफ्टीवर कॅस्ट्रॉल इंडिया, एमएमटीसी, गुजरात पिपावाव, माझगाव डॉक हे टॉप गेनर्सच्या यादीत होते. चोला फिन होल्डिंग्ज, जेके पेपर, प्रेस्टीज इस्टेट, सुमितोमो केमिकल यांचा टॉप लूजर्सच्या यादीत समावेश करण्यात आल्यानं अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

हेही वाचा :

  1. राजस्थानच्या व्यवसायिकाला शेअर मार्केट सल्लागार असल्याचं सांगून १ कोटीला घातला गंडा
  2. शेअर मार्केट फ्रॉड प्रकरण : मध्यप्रदेशातील कॉल सेंटर माटुंगा पोलिसांनी केलं उद्ध्वस्त, न्यायालयानं भामट्यांना ठोठावली कोठडी - Share Market Fraud
  3. बारावी पास रिक्षावाला शेअर मार्केटमध्ये चांगली कमाई करू शकतो मग तुम्ही का नाही?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.