मुंबई Share Market News : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मुंबई शेअर बाजार आज उघडला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारलाय. सकाळच्या सत्रात 800 अंकांच्या वाढीसह 71,500 वर उघडलाय. तर त्याच वेळी एनएसईवर निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह 21,600 वर उघडलाय. शेअर बाजाराच्या जवळपास सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांकात वाढ झाली.
अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार : येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. हा अर्थसंकल्प भारताच्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. मात्र, या मिनी बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या जाणार नसल्याचं त्यांनी आधीच सूचित केलंय. दरम्यान, देशातील महागाई नियंत्रित ठेवणं, सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवून बचतींच प्रमाण वाढविणं, कर संकलन वाढविणं व वित्तीय तूट कमी करणे ही केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर महत्त्वाची आव्हानं असणार आहेत.
गेल्या आठवड्यात कसं होतं शेअर बाजारातील चित्र : गेल्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी शेअर बाजार कोसळला होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 350 अंकांच्या घसरणीसह 70,749 वर बंद झाला होता. त्याच वेळी एनएसईवरील निफ्टी 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 21,378 वर बंद झाला. क्षेत्रांमध्ये, पॉवर निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला होता. तर बँक, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी प्रत्येकी 1 टक्क्यांनी घसरला होता. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरला. बजाज ऑटो, एनटीपीसी, कोल इंडिया लिमिटेड, अदानी पोर्ट यांचा व्यवसायादरम्यान सर्वाधिक लाभ मिळवणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. तर टेक महिंद्रा, सिप्ला, एसबीआय लाइफ, एलटीआयमिंडट्री यांचे शेअर घसरले होते.
हेही वाचा :
- आगामी अर्थसंकल्पात व्यावसायिकांकरिता काय मिळणार सवलत? जाणून घ्या, तज्ज्ञांच मत
- नवीन वर्षात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या कंपनीकडे किती भांडवल? कोण आहे सर्वात श्रीमंत?
- 'फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल' मध्ये IPhone १५ वर मिळतोय भव्य डिस्काउंट! एकदा भेट द्याच
- फ्लिपकार्टमध्ये 'बन्सल युग' संपलं! सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांचा राजीनामा