मुंबई Share Market Live Update : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर करत आहेत. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करत असताना शेयर बाजारात मात्र मोठी उलथापालथ होत आहे. आज सकाळीच 09.45 वाजता शेयर बाजार 47 अंकानी उसळी घेत 80, 454 वर उघडला. तर निफ्टी 21 अंकाची उसळी घेत 24,487 अंकावर उघडला. शेयर बाजारानं आज सकाळपासूनच उसळी घेतल्याचं दिसून आलं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करताना शेयर बाजारात घसरण सुरू झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ( BSE ) मोठी पडझड होत असल्याचं दिसून आलं.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेयर बाजारात घसरण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेयर बाजारात मोठी पडझड झाली. निफ्टी 50 अंकानं खाली घसरल्यानंतर बिएसई 1 हजार अंकानं खाली आहे. सध्या शेयर बाजारात मोठी पडझड सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच धक्का बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेयर बाजारात पडझड सुरू होत असल्याचं स्पष्ट झालं.
शेयर बाजारात त्यानंतर मात्र चढउतार : शेअर बाजारात मंगळवारी सकाळपासूनच चढउतार सुरू असल्याचं दिसून आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यामुळे शेयर बाजारातील ट्रेडिंगमध्ये सतत चढउतार दिसून येत आहे. सकाळी 9:45 वाजता सेन्सेक्स 47 अंकांनी वाढून 80,454 वर तर निफ्टी 21 अंकांनी 24,487 उसळीवर होता. बाजारात लार्जकॅप समभागांसह मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यापार होताना दिसत आहे.
हेही वाचा :