मुंबई : पेटीएम पेमेंट बँकेच्या (Paytm Payments Bank) वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनं 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांवर वॉलेट आणि FASTags वर ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घातली आहे. सर्वसमावेशक प्रणाली ऑडिट अहवालानंतर रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली.
या व्यवहारांवर बंदी : या अंतर्गत, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडून कोणतंही ग्राहक खातं, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादींमध्ये कोणत्याही ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अपला परवानगी दिली जाणार नाही. रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) च्या विरोधात सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट अहवाल आणि बाह्य ऑडिटर्सच्या अनुपालन पडताळणी अहवालानंतर उचललं आहे.
रिझर्व्ह बँकेचं निवेदन : बुधवारी रिझर्व्ह बँकेनं एक निवेदन जारी केलं. निवेदनात माहिती देताना आरबीआयनं म्हटलं की, पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे नियमांचं पालन झालं नव्हतं. यानंतर पुढील कारवाई आवश्यक होती. "29 फेब्रुवारी नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड माध्यम, वॉलेट, फास्टॅग, NCMC कार्ड इत्यादींमध्ये कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अपला परवानगी दिली जाणार नाही," असं रिझर्व बँकेनं नमूद केलं.
नवीन ग्राहक जोडण्यास मनाई : असं असलं तरी, 29 फेब्रुवारी नंतर कोणतंही व्याज, कॅशबॅक किंवा परतावा कधीही जमा केला जाऊ शकतो. यासोबतच आरबीआयनं सांगितलं की, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना बचत बँक खाती, चालू खाती, प्रीपेड माध्यम, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ( NCMC) इ.) कोणत्याही निर्बंधांशिवाय परवानगी दिली जाईल. यापूर्वी, मार्च 2022 मध्ये, RBI नं PPBL ला तात्काळ प्रभावानं नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती.
हे वाचलंत का :