मुंबई HDFC Life : एचडीएफसी बँक HDFC Life या बँकेनं आपल्या तिमाही सत्रातील व्यवसायात चांगलीच वाढ केली. संचालक मंडळानं याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. यात HDFC Life संचालक मंडळानं 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीसाठी पुनरावलोकन केलेल्या आर्थिक अहवालाला मान्यता दिली. HDFC Life कंपनीनं अनेक मेट्रीक्समध्ये लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे HDFC Life कंपनीच्या आर्थिक वर्षातील विकासाची गती वाढली आहे.
जोरदार केली वर्षाची सुरुवात : एचडीएफसी HDFC Life कंपनीनं तिमाहीत व्यवसायात चांगलीच वाढ केली आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या सीईओ विभा पडळकर म्हणाल्या की, "आम्ही वर्षाची सुरुवात जोरदारपणानं केली आहे. HDFC Life कंपनीचा दोन वर्षाचा 21 टक्के सीएजीआर आहे. HDFC Life कंपनीची ही मजबूत वाढ सर्व मेट्रीक्समध्ये आहे. त्यामुळे कंपनीचं काम अगदी जोरात सुरू आहे. IRDAI च्या प्रगतीशील सुधारणांच्या सकारात्मक प्रभावाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे भारतातील जीवन विमा प्रस्तावाला लक्षणीय बळकट करणं अपेक्षित आहे. कंपनीच्या व्यवसायवाढीमुळे हे काम सोपं, अधिक पारदर्शक आणि ग्राहकांसाठी अधिक आकर्षक होईल,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
एचडीएफसी लाईफनं कोणत्या विकासात केली वाढ : एचडीएफसी लाईफनं मार्केट शेयरचा विस्तार केला आहे. खासगी बाजाराचा हिस्सा 16.4 टक्केवरुन 17.1 टक्के इतका वाढला आहे. वैयक्तिक WRP मध्ये एकूण बाजार हिस्सा 11.4 टक्केपर्यंत वाढला आहे. रिटेल सम अॅश्युअर्ड ग्रोथमध्येही एचडीएफसी लाईफनं मोठा व्यवसाय केला. रिटेल सम अॅश्युअर्ड ग्रोथमध्ये कंपनीनं तब्बल 46 टक्के वाढ केली. विम्याच्या पटीत वाढ केल्यामुळे कंपनीला नक्कीचं फायदा झाला.मजबूत रायडर अटॅचमेंट आणि किरकोळ बचतीत 28 टक्के वाढीमुळे मोठी मदत झाली. करानंतरचा नफा तब्बल 15 टक्केनं वाढून तो 478 कोटी इतका झाला. तर बॅकबुक सरप्लसमध्ये 18 टक्के वाढ झाली. व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता 22 टक्के वाढीसह 3 लाख कोटी रुपयांच्या पुढं गेली आहे. बोनस घोषणा 22 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना 3 हजार 722 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च बोनस घोषित करण्यात आला आहे.