ETV Bharat / bharat

युट्युब चॅनेलचे सबस्क्राईब वाढविण्याकरिता शिक्षकानं 'असे' केलं कृत्य, पत्नीसह तुरुंगात झाली रवानगी - YouTube Channel Monetize - YOUTUBE CHANNEL MONETIZE

पत्नीच्या नावानं असलेल्या युट्युब चॅनेलवर शिक्षकानं परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकासह त्याच्या पत्नीला अटक केली.

YouTube Channel Monetize
YouTube Channel Monetize
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 1:29 PM IST

भुवनेश्वर - चॅनेलला सबक्राईब करा आणि लाईक करा, असा आग्रह करून अनेक युट्युबर आपले फॉलोअर्स वाढवितात. त्यामधून चांगली कमाईदेखील करतात. पण, युट्युबमधून मिळणाऱ्या पैशाच्या लोभामुळे ओडिशामधील शिक्षकाला तुरुंगात जावे लागले. एवढेच नव्हे तर त्याच्याबरोबर पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

पहिली ते आठवीच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच युट्यूबवर लिक केल्यानं पोलिसांनी प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षकासह पत्नीला अटक केली आहे. जगन्नाथ कार असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक जयपूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. तर ऋतुपर्णा असे अटकेतील महिलेचं नाव आहे. ती आरोपीची पत्नी आहे. प्रत्येकाला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवायची आहे. तर अनेकांना युट्युब चॅनेलला सबस्क्राईब वाढवून जास्त पैसे मिळवायचे आहेत. मात्र, त्यासाठी शिक्षकीपेशाचं तत्व विसरून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षकावर चौफेर टीका होत आहे.

३० मार्च रोजी अटक- भुवनेश्वर पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार ओडिशा प्राथमिक शिक्षण प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडून (OSEPA) सायबर पोलीसमध्ये १८ मार्चला तक्रार करण्यात आली. प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. पोलिसांनी तपास केला असता गंजममधील रंभा येथील समीर साहूनं प्रश्नपत्रिका समीर एज्युकेशनल या युट्युब चॅनेलवर अपलोड केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला. तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करत पती-पत्नीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला ३० मार्च रोजी अटक केली आहे.

प्रश्नपत्रिका आणि लॅपटॉप जप्त- 'प्रो आन्सर' या युट्युब चॅनेवर प्रश्नपत्रिका अपलोड केल्याचं समीरनं कबूल केलं आहे. आरोपी हा शिक्ष असून जयपूरमधील रहिवासी आहे. त्यानं पत्नीच्या नावे युट्यूब चॅनेल सुरू केले होते. शाळेतून प्रश्नपत्रिका मिळताच त्यानं पत्नीला प्रश्नपत्रिका दिली. परीक्षेबाबत युट्युबवर चर्चा करून प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात आली. युट्युब चॅनेलचे सबक्राईबर वाढविण्यासाठी ही प्रश्नपत्रिका अपलोड केली होती. आरोपीनं लिक केलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. शाळेतील प्रश्नपत्रिका दोन दिवस लपवून परीक्षेपूर्वी दोन दिवस युट्युबवर अपलोड करण्यात आले होते.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.