ETV Bharat / bharat

आकाश आनंद यांना पुन्हा बसपामध्ये मोठी जबाबदारी, मायावतींनी 45 दिवसानंतर पुन्हा का घेतला युटर्न? - mayawati and akash anand - MAYAWATI AND AKASH ANAND

mayawati akash anand Mew बसपा प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा पुतण्या आकाश आनंदकडे पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांना हा निर्णय का घ्यावा लागला? जाणून घेऊया पाच कारणे?

Mayawati And Akash Anand
बसपा प्रमुख मायावती आणि आकाश आनंद (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 11:38 AM IST

हैदराबाद mayawati and akash anand: बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंदला उत्तराधिकारी घोषित करत त्यांची राष्ट्रीय संयोजक पदी निवड केली आहे. मायावतींनीच आकाश यांना मे महिन्यात त्याला अपरिपक्व ठरवून पक्षाच्या सर्व महत्वाच्या पदांवरून मुक्त केलं होतं. यामुळे त्याचे समर्थक संतप्त झाले होते. परंतु त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी द्यावी, अशी पक्षातून मागणी सुरुच होती. कदाचित त्यामुळेच त्यांनी आकाशवर पुन्हा विश्वास व्यक्त करत जबाबदाऱ्या दिल्या असाव्यात, अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये आकाश आनंद यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळाली नसली तरी आकाश आंनदच्या सभा आणि त्यांची भाषणं तरुणामध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम निश्चितच करतात. बसपाला उत्तर प्रदेशात चार वेळा सत्ता मिळली होती. परंतु नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकमध्ये बसपाचा दारूण पराभव झाला. त्यांना लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही.

आकाश आनंद पुन्हा बसपामध्ये परतण्याची कारणं

  1. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाची कामगिरी सर्वात वाईट होती. या निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. यासोबतच पक्षाला मिळणाऱ्या मतदानाची टक्केवारीदेखील घसरली. सध्या पक्षात आकाश आनंद हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांच्या उत्कृष्ट भाषणांना बसपा समर्थकांनी आजवर भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना पक्षातून काढून टाकल्यानं त्यांचे समर्थक संतप्त झाले होते, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात आणून मायावतीनं त्यांच्या समर्थकांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय.
  2. 23 जूनच्या सभेत प्रसिद्ध झालेल्या पत्रात मायावतींनी लिहिले आहे की, संविधान वाचवणं हा एकेकाळी बसपाचा मुख्य मुद्दा होता. काँग्रेसनं या मुद्द्याला हत्यार बनवलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं. बसपानं हा मुद्दा पुन्हा पूर्ण ताकदीनं उचलून पुढं जावा, अशी मायावतींची इच्छा आहे. आकाश पुन्हा ताकदीनं हा मुद्दा उपस्थित करून व्होट बॅक मजबूत करु शकेल, असे त्यांना वाटते. याचा फायदा बसपाला होऊ शकतो.
  3. यूपीमध्ये बसपा दहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. बसपाने पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे यूपीमध्ये बसपाला मजबूत करण्यासाठी आकाश आनंद हे पक्षात परतले आहेत. बसपाचं अस्तित्व टिकण्यासाठी आ काश आनंदने या पोटनिवडणूकीत यश मिळवावं, अशी मायावतींची इच्छा आहे.
  4. मायावती यांनी 23 जूनच्या सभेत जारी केलेल्या पत्रात आकाश आनंद परिपक्व असून त्यांना जबाबदारी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांना पक्षात परत आणून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
  5. आकाश आनंद हे त्यांचे एकमेव राजकीय उत्तराधिकारी आहेत. हा संदेश पक्षात स्पष्टपणे द्यायला हवा, अशी मायावतींची इच्छा आहे. मायावतींनी त्यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवल्यावर मायावती आपला राजकीय उत्तराधिकारी बदलतील का, असे बोलले जात होते. आकाश आनंदला पक्षात परत आणून मायावतींनी या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला.

हेही वाचा

  1. भाजपा, काँग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, बसपा प्रमुख मायावतींचा नागपुरात हुंकार - Mayawati Nagpur Meeting
  2. मायावती राजकारणातून निवृत्तीच्या मार्गावर? २८ वर्षीय पुतण्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
  3. लोकसभा निवडणूक 2024 : बसपा प्रमुख मायावती आज नागपुरात घेणार सभा, लोकसभा निवडणूक प्रचाराचा उडवणार 'धुरळा' - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.