ETV Bharat / bharat

इंजिनिअर ते पॉलिटिक्स; बिहारचे नवे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचा धक्क करणारा राजकीय प्रवास, घ्या जाणून - नितीश कुमार

Bihar DCM Vijay Sinha : बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर विजय सिन्हा यांनी नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, याआधीही त्यांनी नितीश कुमार सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलं आहे. 2017 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपासोबत पुन्हा सरकार स्थापन केलं, तेव्हा विजय सिन्हा यांना कामगार संसाधन मंत्री करण्यात आलं होतं.

Vijay Sinha
Vijay Sinha
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 9:58 PM IST

पाटणा (बिहार) Bihar DCM Vijay Sinha : बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालंय. भाजपाच्या पाठिंब्यानं नितीश कुमार हे मुख्यमंत्री तर दोन नेते हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी भाजपानं बिहारच्या राजकारणात मोठा बदल केला आहे. गेल्या वेळी भाजपानं मागास जातीतून आलेल्या तारकेश्वर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री केलं होतं, तर यावेळी भूमिहार समाजातील विजय सिन्हा आणि मागास जातीतील सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं आहे.

विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी : बिहारमधील मोठ्या राजकीय गोंधळानंतर अखेर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीएसोबत सरकार स्थापन केलंय. रविवारी राजभवन गाठून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांच्याकडं सुपूर्द केला. त्यामुळं राज्यातील 17 महिन्यांचं महाआघाडीचं सरकार कोसळलंय. बिहारमध्ये स्थापन झालेल्या एनडीए सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

कोण आहेत विजय सिन्हा? : विजय सिन्हा हे बिहारच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा मानले जातात. लखीसराय मतदारसंघाचे ते आमदार आहेत. तसंच बिहार विधानसभा अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्यांनी लखीसराय मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडणूक जिंकली. वर्ष 2000 मध्ये विजय सिन्हा यांना भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या राज्य संघटनेच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2004 मध्ये ते भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य झाले, त्यानंतर किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस झाले. त्यानंतर भाजपानं त्यांना बेगुसराय आणि खगरिया जिल्ह्याचं प्रदेश प्रभारीही केलं होतं.

सलग तीन वेळा आमदार : मार्च 2005 मध्ये विजय सिन्हा पहिल्यांदा लखीसरायमधून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 6 महिनं राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांनी 2010 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर ते लखीसराय मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार होते.

नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री : बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. मात्र, याआधीही त्यांनी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलं आहे. 2017 मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी आरजेडीला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत पुन्हा सरकार स्थापन केलं, तेव्हा विजय सिन्हा यांना कामगार संसाधन मंत्री करण्यात आलं. विजय सिन्हा यांची नेहमीच पक्षासाठी समर्पित नेता अशी प्रतिमा आहे. त्यामुळं भाजपानं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय.

इंजिनिअरिंग सोडून राजकारणात करिअर : भूमिहार समुदाय आणि आरएसएस पार्श्वभूमीतून आलेले विजय सिन्हा यांचा जन्म 5 जून 1967 रोजी लखीसरायच्या टिळकपूरमध्ये झाला होता. त्यांचं वडील दिवंगत शारदा रमण सिंह पटना येथील बेधना हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक होते. त्यांच्या आईचं नाव सुरमादेवी आहे. बालपणीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सामील झाले होते. 1980 मध्ये, वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी बारह येथे आयोजित भाजपाच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता. वयाच्या 15 व्या वर्षी ते दुर्गा पूजा समितीचे सचिव झाले. 1983 मध्ये एएन कॉलेजमध्ये शिकत असताना, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील होऊन विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. दोन वर्षांनी (1985) पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत असताना, ते सरकारी पॉलिटेक्निक मुझफ्फरपूर विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. 1990 मध्ये सिन्हा यांच्याकडं पाटणा महानगर भाजपाच्या राजेंद्र नगर मंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती.

हे वाचलंत का :

  1. 'बिहारचे योगी' बनले नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत सम्राट चौधरी?
  2. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  3. मराठमोळ्या विनोद तावडेंची बिहारमध्ये चर्चा; सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.