कोलकाता CM Mamata Banerjee Major Injury : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी घसरुन पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
ममता बॅनर्जी रुग्णालयात भरती : ममता बॅनर्जी यांना तातडीनं सुपर स्पेशालिटी एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारासाठी वुडबर्न वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होत्ं. यानंतर त्यांना वुडबर्न ब्लॉकमधून ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आलंय. कोलकाताचे महापौर फरहाद हकीम आणि पक्षाचे अनेक नेतेही रुग्णालयात पोहोचले आहेत. ममता बॅनर्जींवर डॉक्टरांची एक खास टीम लक्ष ठेवून आहे.
ममता बॅनर्जींसाठी प्रार्थना : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) नं 'एक्स'वर एक पोस्ट शेयर केलीय. ममता बॅनर्जींसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन 'टीएमसी'नं नागरिकांना केलंय. "आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झालीय. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा," असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय. तसंच पक्षानं बॅनर्जींच्या कपाळातून रक्तस्त्राव होत असल्याचा फोटोही पोस्ट केलाय. पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ममता बॅनर्जी या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या तब्येतीची विचारपूस केलीय." या परिस्थितीतून ममता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतो", अशी पोस्ट पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर शेयर केलीय. ममता बॅनर्जी यांच्या अपघातानंतर विविध राजकीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. तसंच त्या या संकटातून ठीक व्हाव्यात यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
एमके स्टॅलिन यांनी केली प्रार्थना : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही 'एक्स' वर पोस्ट करत म्हटलं की, "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दीदी यांच्यासोबत झालेल्या अपघातामुळं धक्का बसलाय. यामुळं मी अतिशय चिंतित आहे. या कठीण काळात मी त्यांच्यासोबत आहे. लवकरात लवकर बऱया होण्यासाठी प्रार्थना करतो."
हेही वाचा -