केरळ(वायनाड) Wayanad Landslide Rescue Operations : वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत जळपास 250 जणांचा मृ्त्यू झाला असून, हजारोंच्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी आताही मदत आणि बचाव कार्य राबवलं जात आहे.
#WATCH | On Wayanad landslide, Kerala Health Minister Veena George says, " ...we have handed over 154 bodies to the district administration. we are taking genetic samples of the recovered body parts...our cm asked for the support of the army and airforce and we were provided with… pic.twitter.com/2MShHMe92l
— ANI (@ANI) August 1, 2024
जवळपास 250 जणांचा मृत्यू : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीच्या डोंगराळ भागात भूस्खलनात मृतांची संख्या 249 वर पोहोचली आहे. मंगळवारी ही दुर्घटना घडली होती. आज तीन दिवसानंतरही या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाची मदत या मदत कार्यासाठी घेतली जात आहे. मंगळवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं भूस्खलनात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित रस्क्यू करण्यात आलं.
आम्ही ३० जुलैच्या सकाळपासून केरळ सरकार आणि दुर्घटनेतील नागरिकांच्या मदतीसाठी आलो आहोत. आम्ही १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत आणि एकूण मृतदेहांची संख्या खूप जास्त आहे. यातील अनेक नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. घरांमध्ये जाऊन लोक अडकले आहेत का ते आम्ही आता पाहत आहोत. जड उपकरणं घटनेच्या ठिकाणी आणण्यासाठी पूल बांधण्यात येत होता. तो आता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळं शोध आणि बचाव कार्याची गती वाढेल - मेजर जनरल मॅथ्यू
#WATCH | Wayanad landslide | On search and rescue operations, Major General Mathew says, " ...we are here supporting the kerala govt and people since 30th july morning. we have recovered 100+ bodies and overall body count is much more. we have also rescued so many people...almost… pic.twitter.com/yDRMAKVOSs
— ANI (@ANI) August 1, 2024
मदत आणि बचाव कार्य सुरूच : वायनाडमधील भूस्खलनग्रस्त चुरलमाला येथे शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. सध्या येथे भारतीय सैन्य, डीएससी सेंटर, प्रादेशिक सेना, एनडीआरएफ, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे एकत्र मिळून जवळपास १२०० सैनिक मदत कार्यासाठी तैनात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक : वायनाडमध्ये विविध एजन्सींच्या बचाव पथकं बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी आणि भूस्खलनानंतर मदत पुरवण्याचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत दुर्घटनेबाबत चर्चा होणार आहे.