हैदराबाद What Happens When You Wash Chicken : चिकन करी हा अनेक खवय्यांचा आवडीचा पदार्थ आहे. जगात प्रत्येक मिनीटाला तब्बल 1 लाख 40 हजार कोंबड्यांची कत्तल केली जाते. या आकडेवारीवरुन चिकन जगात किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज लावता येतो. चिकन आवडीनं खाल्लं जात असल्यानं अनेक जण चिकन मोठं चवीनं बनवतात. मात्र अनेकांना चिकन बनवताना ते अगोदर रगडून धुवून काढतात. मात्र असं चिकन धुणं आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. द कॉन्व्हर्सेशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून चिकन शिजवण्यापूर्वी ते रगडून धुवून घेऊ नये, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
चिकनमध्ये असतात हानिकारक सूक्ष्मजंतू : चिकन चवीनं खायला अनेक नागरिकांना आवडते. मात्र चिकनमध्ये खरोखरचं घातक सूक्ष्मजंतू असतात, असं संशोधनातून उघड झालं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, "चिकन बनवण्यापूर्वी चिकन धुतल्यानं त्यामधील सूक्ष्मजंतू निघत नाहीत. चिकनमध्ये साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर सारखे घातक सूक्ष्मजंतू असतात. या सूक्ष्मजंतूमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधी कधी संसर्ग, ताप, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा जास्त फटका बसतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांना विविध आजार होण्याची शक्यता जास्त असते.
चिकनमधील घातक सूक्ष्मजंतूचा संसर्ग : चिकन खाण्यास सगळ्यांना आवडत असलं, तरी त्याच्या खाण्यात खूप मोठा धोका आहे. चिकनमध्ये घातक साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टरमुळे गंभीर संसर्ग होण्याची शक्यता असते. साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टरमुळे काहीवेळा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे. अशा सूक्ष्मजंतू संसर्ग असलेल्या चिकनला स्वयंपाकघरात धुताना त्यावरील सूक्ष्मजंतू हाताला सर्वत्र चिटून राहतो. आपण चिकन घेऊन त्याच हातानं इतर गोष्टी करतो. त्यामुळं घातक सूक्ष्मजंतू शरीरावर संसर्ग करण्याची शक्यता असते. हे सूक्ष्मजंतू सगळ्या घरभर पसरुन संसर्ग करण्याची शक्यता असते. हे सूक्ष्मजंतू डोळे, कान, नाक, आणि तोंडातून शरीरात पसरण्याची शक्यता संशोधकांनी दिली आहे. त्यामुळे चिकन न धुता ते शिजवण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
चिकन न धुता शिजवलं तर घातक सूक्ष्मजंतूचं काय होते ? : या अहवालात संशोदकांनी चिकन न धुता शिजवण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. मात्र अनेक नागरिकांना चिकन न धुता शिजवलं तर त्यातील घातक सूक्ष्मजंतूचं काय होते. चिकनमधील हे घातक सूक्ष्मजंतू न धुतल्यानं थेट शरीरात जाऊन संसर्ग करण्याची अनेकांना भीती वाटते. मात्र आपण चिकन शिजवताना ते खूप मोठ्या उष्णतेवर शिजवतो. त्यामुळे इतक्या उष्णतेवर कोणताही सूक्ष्मजंतू जीवंत राहत नाही, असं या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चिकन शिजवताना नाकावर आणि चेहऱ्यावर हात ठेऊ नका, असा सल्ला संशोधक देतात. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर साबणानं हात आणि भांडे स्वच्छ करण्यात यावे, असंही संशोधकांनी या अहवालात नमूद केलं आहे.
हेही वाचा :