नवी दिल्ली LK Advani Admitted To Apollo : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा खालावल्यानं त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री 9 वाजता डॉ विनित सुरी यांच्या देखरेखीखाली अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दुसऱ्यांदा रुग्णालयात : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सुप्रसिद्ध डॉक्टर विनित सुरी यांच्या देखरेखीखाली अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती अपोलो रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांना 26 जूनला अस्वस्थ वाटू लागल्यानं एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 मार्चला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. सलग तिसऱ्यांदा देशात भाजापानं सरकार स्थापन केल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनी मोठा आनंद व्यक्त केला. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म कराचीत झाला असून देशाची फाळणी झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत स्थायिक होणं पसंद केलं. दिल्लीतूनच त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. लालकृष्ण अडवाणी यांनी 1942 मध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघात प्रवेश करुन समाजकार्याला सुरुवात केली.
हेही वाचा :