ETV Bharat / bharat

ज्ञानवापीच्या व्यास तळघरात 30 वर्षांनंतर पूजेला सुरुवात; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली आरती - ज्ञानवापी मशिद तळघरा

Gyanvapi Vyas Puja : वाराणसीतील ज्ञानवापीच्या व्यास तळघरात बुधवारी (31 जानेवारी) रात्री उशिरा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा सुरू करण्यात आली. दरम्यान, यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 10:16 AM IST

Updated : Feb 1, 2024, 11:32 AM IST

ज्ञानवापीच्या तळघरात पूजेला सुरुवात

वाराणसी Gyanvapi Vyas Puja : ज्ञानवापी संकुलात नंदी महाराजांसमोरील व्यासजींच्या तळघरात 1993 पर्यंत सुरू असलेली पूजा 30 वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. जिल्हा दंडाधिकारी एस. राज लिंगम, पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन तसंच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथे आरती करण्यात आली.

वरिष्ठ अधिकारी होते हजर : मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा अधिकारी आणि आयुक्त कुणालाही न कळू देता विश्वनाथ मंदिर परिसरात दाखल झाले होते. बुधवारी रात्री 11 वाजता नंदी महाराजांसमोरील तळघर मार्गाजवळील बॅरिकेट्स हटवण्याचे काम सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन तासांनी म्हणजेच पहाटे 1 वाजता ते पूर्णपणे हटवण्यात आले.

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार : बुधवारी (31 जानेवारी) दुपारी, वाराणसी जिल्हा न्यायालयानं हिंदूंच्या बाजूनं मोठा निर्णय दिला. जिल्हा न्यायाधीशांनी जिल्हा अधिकारी वाराणसी यांना व्यास जी म्हणजेच सोमनाथ व्यास यांच्या तळघरात पूजा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. शैलेंद्र पाठक यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले होते. यापूर्वी, न्यायालयाने व्यासजींच्या तळघराचा रिसीव्हर म्हणून जिल्हा दंडाधिकारी यांचीही नियुक्ती केली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी व्यास तळघरात पुन्हा पूजा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार व्यासजींचे नातू आणि विश्वनाथ मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राग, भोग आणि पूजा करण्यासाठी येथे पुजारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

रात्री बॅरिकेटिंग हटवले : संबंधित ठिकाणी बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. यानंतर शांतता व इतर बाबी लक्षात घेऊन रात्री उशिरा त्यावर काम सुरू करण्यात आले. रात्री 9:30 वाजेच्या आसपास ज्ञानवापी मार्गे जाणारे विश्वनाथ धामचे गेट क्रमांक 4 भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात बॅरिकेटिंग हटवण्यात आले. यानंतर विश्वनाथ मंदिराशी संबंधित सफाई कर्मचारी आत आले. त्यानंतर आतमध्ये असलेल्या मूर्ती आणि इतर वस्तू व्यवस्थित मांडून गणेश-लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. पूजा आटोपल्यानंतर ज्ञानवापी संकुलातील तळघरात आरतीही करण्यात आली. तसंच यावेळी दीपप्रज्वलनही करण्यात आले.

16 पोलीस ठाण्यांचा फौजफाटा उपस्थित : वाराणसीचे जिल्हाधिकारी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले की, "न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात आले असून व्यास तळघरात पूजा करण्यात आली आहे." तसंच यासंदर्भात प्रतिक्रिया देत पोलीस आयुक्त अशोक मुथूट जैन म्हणाले की, "कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विश्वनाथ धामबाहेर बॅरिकेटिंग हटविण्याचे काम सुरू असताना 16 पोलीस ठाण्यांतील फौजफाटा उपस्थित होता." शहरातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार, मुस्लिम पक्ष हायकोर्टात जाणार
  2. भारताची संस्कृती आणि भारतीय लोक इतिहासाच्या पलीकडे- योगी आदित्यनाथ
  3. ज्ञानवापी मशीद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयानं मुस्लिम पक्षकारांच्या सर्व याचिका फेटाळल्या

Last Updated : Feb 1, 2024, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.